Monday, November 7, 2011

2.  माहं साजरं शिवार.....

वाहे पाट झूळझूळ
वरुनाची कृपा थोर
नाचती मनाचे मोर
माहं साजरं शिवार

पीक करी सळसळ
डोले मळा हिर्रागार
आला आनंदाले जोर
माहं साजरं शिवार

गल्यात घुन्गुरमाळ
बैल जोड़ी ती सुंदर
सजविन्या हो तय्यार
माहं साजरं शिवार

न्याहारिची मजा न्यारी
लक्ष्मी आनते भाकरी
ठेचा संगती भाकरी
अन्न हेच पोटभरी

बाग़ फुलली सुंदर
फूल डोले नवथर
स्वागताला हो तय्यार
माहं साजरं शिवार

सुनील जोशी
७/११/२०११

1. माहं साजरं शिवार

कोन्या एका काळी
कधी तरी होतं
माहं ह्यें शिवार
साजरं शिवार

लक्ष्मी वानी माही
घर वाली होती
चारी बी बाजूने
येई हो आबादी

दिस असे आले
नापिकी शेताले
नाही आता घरी
काहीबी खायाले

पाटिलकी असी
असी राहे जी हें
भीक बी कोनाले
मांगता ना येते

नावाचे पाटिल
सारी रया गेली
याद भारी येते
माह्या शिवाराची

साजरं शिवार
यादीत राह्यलं
यादिनं डोळ्यात
टिपं दोन आलं

कई यीन आता
दिस पलटून
फुलेन का कधी
थेवालं हो माहं
साजरं शिवार
माहं साजरं शिवार.....


सुनील जोशी
७/११/२०११