Tuesday, December 13, 2011

रंगमंच.....

परवा माझ्या लहानश्या मुलीचा स्टेज परफोर्मन्स होता , पहिला स्टेज परफोर्मन्स ... आता पहिला परफोर्मन्स म्हंटल्याव़र आई, बाबा, आजी,आजोबा सगळे सगळे झाडून हजर होते त्या कार्यक्रमाला. चार वर्षांची ती चिमुरडी, पण तिचा तो उत्साह , तो आत्मविश्वास... जबरदस्त... चार डांस मधे भाग घेतला होता तिने.

सकाळी ११ वाजता तिला कार्यक्रमस्थळी घेउन आलो. दोन मिनिटात बाय बाबा करून चिमुरडी पसार झाली आपल्या मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात. दुपारी साडेबारा ला पहिला नाच. मग थोड़ा आराम , मग २ वाजता दूसरा , ३.३० ला तीसरा ... साडेचार ला चौथा...जाम खुश होती ती हे सगळ करताना. पहिल्यांदा स्टेज व़र वावरते आहे असं कुठेच नव्हतं जाणवत. अकरा ते पाच स्टेज व़र जायची तयारी ... मग परफोर्मन्स , पुन्हा पुढची तयारी ... एक चक्र... पण सगळ करताना सोबत होता प्रचंड उत्साह प्रचंड चैतन्य.
आयोजकांनी सरते शेवटी सगळ्या कलाकारांचं कौतुक म्हणुन प्रत्येकाला एक एक टेडीबीयर आणि कैडबरी च एक मोट्ठ चोकोलेट भेट दिलं. काय आनंद ओसंडून वहात होता त्या चिमुर्डिच्या
चेहे-यावरून....

मी सहज विचार करायला लागलो, त्या चिमुकल्यांच्या निरागसतेचा.... जीवनाचा अभ्यासक विद्यार्थी मग सहज जागा झाला माझ्यातला. कित सुंदर असते ना हें बालपण. आम्हाला पण काही शिकता येईलच कि त्यातून.

ही लहानशी चिमुरडी मुलं , पण करतात कसं सगळ अगदी मन लाऊन, मनमोकळेपणानं. काही मिळवायचा, काही साध्य करायचा .... स्वार्थाचा लवलेश सुद्धा नसतो त्यांच्या मनात .

तिचं ते स्टेज वर जाण, बिनधास्तपणे कार्यक्रम देणे त्यात जीव लाऊं , अगदी झोकुन देउनं काम करण, एक परफोर्मन्स झाल्यावर परत उत्साहान दुस-या साठी तयार होण, तयार झाल्यावर रांगेत लागण ... सगळ कसं शिस्तबद्ध , एकच ध्यास , एकच आंस... परफ़ॉर्म करायचंय ... मस्त परफ़ॉर्म करायचंय. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नाही आणि हाव पण नाही .... बस करायचंय म्हणजे करायचंय, हाच ध्यास हीच भावना

शेक्सपियर म्हणून गेलाय ... "जग़ हें रंगमंच आणि त्यावरचे कलाकार ... कठपुतल्या , आमची डोर त्याच्या हातात ... या रंगमंचावर वावरताना किती मुखवटे घालून वावरत असतो ना आम्ही
या लहान मुलांसारखा निरागसतेचा मुखवटा नाही घालत पण कधी आम्ही . असं लहान होउन , निरागस होउन , आपल्या भूमिकेत स्वतःला प्रामाणिक पणे झोकुन देऊन जगणार का कधी आम्ही ?

तो टेडीबीयर उराशी कवटाळत , धावत माझ्या जवळ आलेली माझी ती लेक , आता त्या मोट्ठ्या कैडबरी चे लहान लहान तुकडे करून एक आजी ला एक आजोबा ला एक आई ला आणि एक बाबाला देऊन एक मोठा तुकडा स्वतःच्या तोंडात कोंबण्यात मशगुल झालेली होती ...

सुनील जोशी
१३/१२/११

रंगमंच.....

परवा माझ्या लहानश्या मुलीचा स्टेज परफोर्मन्स होता , पहिला स्टेज परफोर्मन्स ... आता पहिला परफोर्मन्स म्हंटल्याव़र आई, बाबा, आजी,आजोबा सगळे सगळे झाडून हजर होते त्या कार्यक्रमाला. चार वर्षांची ती चिमुरडी, पण तिचा तो उत्साह , तो आत्मविश्वास... जबरदस्त... चार डांस मधे भाग घेतला होता तिने.

सकाळी ११ वाजता तिला कार्यक्रमस्थळी घेउन आलो. दोन मिनिटात बाय बाबा करून चिमुरडी पसार झाली आपल्या मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात. दुपारी साडेबारा ला पहिला नाच. मग थोड़ा आराम , मग २ वाजता दूसरा , ३.३० ला तीसरा ... साडेचार ला चौथा...जाम खुश होती ती हे सगळ करताना. पहिल्यांदा स्टेज व़र वावरते आहे असं कुठेच नव्हतं जाणवत. अकरा ते पाच स्टेज व़र जायची तयारी ... मग परफोर्मन्स , पुन्हा पुढची तयारी ... एक चक्र... पण सगळ करताना सोबत होता प्रचंड उत्साह प्रचंड चैतन्य.
आयोजकांनी सरते शेवटी सगळ्या कलाकारांचं कौतुक म्हणुन प्रत्येकाला एक एक टेडीबीयर आणि कैडबरी च एक मोट्ठ चोकोलेट भेट दिलं. काय आनंद ओसंडून वहात होता त्या चिमुर्डिच्या
चेहे-यावरून....

मी सहज विचार करायला लागलो, त्या चिमुकल्यांच्या निरागसतेचा.... जीवनाचा अभ्यासक विद्यार्थी मग सहज जागा झाला माझ्यातला. कित सुंदर असते ना हें बालपण. आम्हाला पण काही शिकता येईलच कि त्यातून.

ही लहानशी चिमुरडी मुलं , पण करतात कसं सगळ अगदी मन लाऊन, मनमोकळेपणानं. काही मिळवायचा, काही साध्य करायचा .... स्वार्थाचा लवलेश सुद्धा नसतो त्यांच्या मनात .
तिचं ते स्टेज वर जाण, बिनधास्तपणे कार्यक्रम देणे त्यात जीव लाऊं , अगदी झोकुन देउनं काम करण, एक परफोर्मन्स झाल्यावर परत उत्साहान दुस-या साठी तयार होण, तयार झाल्यावर रांगेत लागण ... सगळ कसं शिस्तबद्ध , एकच ध्यास , एकच आंस... परफ़ॉर्म करायचंय ... मस्त परफ़ॉर्म करायचंय. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नाही आणि हाव पण नाही .... बस करायचंय म्हणजे करायचंय, हाच ध्यास हीच भावना

शेक्सपियर म्हणून गेलाय ... "जग़ हें रंगमंच आणि त्यावरचे कलाकार ... कठपुतल्या , आमची डोर त्याच्या हातात ... या रंगमंचावर वावरताना किती मुखवटे घालून वावरत असतो ना आम्ही
या लहान मुलांसारखा निरागसतेचा मुखवटा नाही घालत पण कधी आम्ही . असं लहान होउन , निरागस होउन , आपल्या भूमिकेत स्वतःला प्रामाणिक पणे झोकुन देऊन जगणार का कधी आम्ही ?









तो टेडीबीयर उराशी कवटाळत , धावत माझ्या जवळ आलेली माझी ती लेक , आता त्या मोट्ठ्या कैडबरी चे लहान लहान तुकडे करून एक आजी ला एक आजोबा ला एक आई ला आणि एक बाबाला देऊन एक मोठा तुकडा स्वतःच्या तोंडात कोंबण्यात मशगुल झालेली होती ...

सुनील जोशी
१३/१२/११







 

Monday, November 7, 2011

2.  माहं साजरं शिवार.....

वाहे पाट झूळझूळ
वरुनाची कृपा थोर
नाचती मनाचे मोर
माहं साजरं शिवार

पीक करी सळसळ
डोले मळा हिर्रागार
आला आनंदाले जोर
माहं साजरं शिवार

गल्यात घुन्गुरमाळ
बैल जोड़ी ती सुंदर
सजविन्या हो तय्यार
माहं साजरं शिवार

न्याहारिची मजा न्यारी
लक्ष्मी आनते भाकरी
ठेचा संगती भाकरी
अन्न हेच पोटभरी

बाग़ फुलली सुंदर
फूल डोले नवथर
स्वागताला हो तय्यार
माहं साजरं शिवार

सुनील जोशी
७/११/२०११

1. माहं साजरं शिवार

कोन्या एका काळी
कधी तरी होतं
माहं ह्यें शिवार
साजरं शिवार

लक्ष्मी वानी माही
घर वाली होती
चारी बी बाजूने
येई हो आबादी

दिस असे आले
नापिकी शेताले
नाही आता घरी
काहीबी खायाले

पाटिलकी असी
असी राहे जी हें
भीक बी कोनाले
मांगता ना येते

नावाचे पाटिल
सारी रया गेली
याद भारी येते
माह्या शिवाराची

साजरं शिवार
यादीत राह्यलं
यादिनं डोळ्यात
टिपं दोन आलं

कई यीन आता
दिस पलटून
फुलेन का कधी
थेवालं हो माहं
साजरं शिवार
माहं साजरं शिवार.....


सुनील जोशी
७/११/२०११

Sunday, August 21, 2011

हातावरचं पोट......

धो धो पाउस कोसळतोय. कधीचा कोसळतोय. थोड़ा सुद्धा उसंत घेत नाहीय्ये.घरात मी आणि छोटी फ़क्त. कधी पासुनची रडत होती, आई ची वाट बघत . रडून रडूनथकली आणि आता निपचित पडली आहे झोळीत. तिला रडतांना बघून मला पण रडू येऊलागलं होतं. आणि आता माझे पण डोळे सुकून गेलेत. नेहेमी एव्हाना ती येउनजात असते. अड़कुन पडली असेल कुठेतरी ह्या पावसात. तिच्या जवळ तर छत्री पणनाही.कोसभर अंतरावर जावं लागतं रोज तिला. बाबा पण सकाळी सकाळीच जातात निघून.चौकात उभे रहातात , त्या मुकादमाची वाट बघत. नशिबात असलं तर भेटते रोजी.नाही तर मग बसून रहातात तिथेच दिवसभर. रोजी असली की त्या दिवशी भेटतेखायला , आणि त्यांच्या पण पव्व्य्याची होते सोय. पव्वा मारला तरी बाबागपचिप झोपून रहातात , भांडत नाही इतर लोकांसारखे.बाबा ला कधी रोजी मिलायची तर कधी दिवस भर बसून रहावं लागायचं. खाणारीतोंडं वाढायला लागलेली. मग आईने विचार केला आणी तिच्या आवाक्यात असलेलीकामं .....म्हणजेच चार घराची कामं धरलीत.ते सगळे लोक मोठ्या घराचे होते. आमच्या वस्तीला ते झोपड़पट्टी म्हणायचे.आई मला कधी कधी घेउन जायची त्यांच्या कड़े. माझ्या सारखीच त्यांच्याकडे पणलहान लहान मुलं असायचीत. पण ती सगळी शाळेत जायची. त्यांचे कपडे ,शाळेचेड्रेस वगैरे खुपच मस्त मस्त असायचे. मलापण वाटायचं आपण पण त्यांच्यासारखे कपडे घालावे, शाळेत जावं ..... पण .... हं ...आमच्या झोपड़पट्टी मधे म्हणे असं काही करत नसतात. त्या घराच्या मालकीणबाई कधी कधी मला खाऊ द्यायच्या... मला आवडायचा तो, आई कधीच नाही करायचीतसं काही घरी. ती मुलं मात्र मला कधीच त्यांच्यात खेलायला नाही घ्यायचीतत्यांच्यात. त्यांच्या लेखी आम्ही झोपड़पट्टी मधली मुलं.गावाच्या सीमेवर असलेल्या मारुती मंदिरा पासून पुढे एक रस्ता होतात्याच्या ही पुढे होती आमची ती वस्ती. गावकुसाबाहेर ची आमची ती वस्ती.आमच्या झोपडी सारख्याच अजुन २० एक झोपड्या होत्यात तिथे. सगळे राहणारेलोक तिथे झोपडितच रहायचे, आमच्या सारखे.माझ्या जन्माच्या ही अगोदर ...खुप आधी ... कधीतरी भटकत भटकत पोहोचले होतेम्हणे ते इथे. गावाकडे होते , मोलमजुरी करून पोट भरत होते ... आणि मगअचानक आक्रित घडलं ...तो महापुर काय आला... म्हणे होत्याचं नव्हतं करूनगेला. घर दार भांडीकुंडी...इतकाच काय तर घरातल्या म्हातारा आणिम्हातारीला पण घेउन गेला, परत कधीच ना दिसण्यासाठी.त्यानंतर त्या दोघांचं मन रमेना तिकडे. तसाही खुप काही लला नव्हताच त्यादोघांना तिथला. पण मग तर त्यांनी ठरवलचं ते गाव सोडायचं म्हणून. सोडायचंगाव हें तर ठरलं , पण नेमकं जायचं कुठे ...त्याचा काही पत्ता नव्हता. मगआले भटकत भटकत असेच ..अन पोहोचले ह्या महानगरात.त्यावेळी हें शहर तसं फार मोठं नव्हतं म्हणे. असेल दीड-दोन लाखाची वस्ती.पण काम मिलायचं. तेव्हा सुद्धा घरं भाड्यानी मिलायची पण ... कमाई अशीनव्हतीच . मग कोणी तरी त्यांना ही जागा दाखवली. उजाड़ माळरानावरची. तुरळकझोपड्या असलेली.कुठून तरी वासे आनले , तट्टे आनले .. आणि शाकारली एक झोपडी. मी माझ्यालहानपणा पासून बघतेय... अगदी तशीच, तेवढीच ... अजुनही.रात्रभर रिमझिमणारा पाउस, पहाटे पहाटे त्यांन चांगलाच वेग धरला होता.चंद्रमौळी झोपडीला असलेल्या ठीगलामधून रात्रभर टपटपणा-या थेबांना थोपवूनधरणा-या त्या प्लास्टिकच्या झोळ्या आता रामप्रहरीच राम म्हणणार असंवाटायला लागलं होतं. खालून काठीने ढूश्या मारून मारून ते साचलेलं पाणीबाहेर काढण्यात चानीन रात्र जवळ पास जागुन काढली होती.मधेच म्हाता-याला ढास लागली, खोकल्याची ती उबळ थांबता थांबेना. प्लास्टिकढोसता ढोसता मधेच चानी थांबली, म्हाता-या कड़े धावली, एखादा पेला पाणीद्यावं म्हणून , तर म्हाता-याचं नशीब असं फुटकं की माठात एक थेंब पाणीनव्हतं. इकडे धुवाधार बरसत होता आणि तिकडे प्यायला एक थेंब पाणीनाही....कसली विडंबना. मग तिन कसबसं म्हाता-याला उठवून बसवलं . आडव्याचाउभा केल्यान की बरच वेळ खोकलुन झाल्यामुळे असेल म्हणा.... नेमकं काय असेलते असो पण आता म्हाता-याचं खोकलण ज़रा थांबल्या सारखं वाटत होतं .निस्तेज चेहे-यान आणि जवळ पास निष्प्राण डोळ्यानी म्हातारा आजू बाजू लाटकमक टकमक बघत होता. त्याच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यात साठवलेल्याहोत्या त्या आठवणी. लहानशी चानी, तिची तिच्याहून लहान बहिन मुन्नी , चानीची माय ... सगळे कसे झरझर त्याच्या स्मृति पटलावर दिसत होते.रडून रडून थकली ... आणि झोपी गेलेली ती मुन्नी ...मग पुन्हा कधी उठलीचनाही. नंतर चानी आणि तिची माय , त्यांची आणि त्याची होणारी धावपळ... सगळसगळ कसं अगदी काल घडल्या सारखं वाटत होतं. जगण्याची अपरिहार्यता त्यांनाजगवित असावी.खुप खुप मेहेनत करू आणि स्वतःचे अगदी छोटेसे का होईना एक घर बांधू हीमंशा. पण रोजची कमाई फ़क्त पोटातच जिरून जायची. एखाद्या दिवशी नाही मिळालीरोजी की रोटीलाही मोताज असायचे ते लोक. कसंबसं जगण सुरु होतं.निस्तेजश्या चेहे-यावर चार सुरकुत्या अजुन वाढल्या. जगण सुरूच होतं. आताधावपळ पुर्विसारखी नव्हती होत , पण तरीही रोज ठिय्यावर बसून वाट पहांणसुरूच होतं. भाकरी सोबत कालवणाची सोय व्हावी म्हणून चानी ची मायदुरवरच्या चार घरी घरकाम करत होतीच. चानी आता मोठी झाली होती. त्याला कधीकाम मिळायचं तर कधी खाडा पडायचा. कधी मायला सणासुदीला चार घरी काहीमिळायचं , आणि मग त्याच्या कड़े रात्र साजरी व्ह्यायाची.त्या ही दिवशी असाच ठिय्यावर बसला होता , वाट बघत .... मुकादमाच्याबोलावण्याची. पण काही लक्षण दिसता नव्हतं. चानी... हो चानीच दिसत होतीती. दुरून धावत येत होती. बा ...बा.. ती त्याच्याजवळ पोहोचत धापा टाकितबोलू लागली. धावत आल्याने तिला धाप लागलेली होती. बा .... माय कशी कशी चकरते आहे .त्यानही मग काय विचार केला ... सोडला नाद रोजिचा ...आणि झप झप निघाला झोपडिकडे.लांब लांब ढांगा टाकत तो तड़क पोहोचला आणि कुडाचं दार लोटून आत शिरला. आतसामसूम जाणवली. त्या अंधारात त्याला आधी काही दिसलच नाही. मग दिसलीत्याला चानीची माय ... शांत झोपलेली ... कायमची ....त्याच्या पाठोपाठ शिरलेल्या चानी कड़े त्यांन बघितलं ,एकदा तिच्या कड़े आणिएकदा तिच्या माय कड़े बघत होता . एकदम भानावर आला आणि दुखःवेगाने मोठ्यानेहम्बरडा फोडला त्यांन .दिवस सरत होते. चानिनं आता मायची जागा घेतली होती. खाणारं एक पोट कमीझालं होतं. चानिनं नविन घरात कामं धरली होती. ही घरं जुन्या घरांपेक्षाजवळ होती. नवी वस्ती आता त्यांच्या उकिरडया च्या जवळ पोहोचली होती. त्याकॉलनी मधल्या सात आठ घरात भांडी धूण करून ती आता दोघांच्या पोटापुरतंमिळवून घेत होती .आता बरच उजाडलं होतं पावसाचा जोर पण ओसरला होता.बा ... येते रे मी .... म्हाता-या कड़े एक कटाक्ष टाकत ती ओरडली.किसनमामाच्या बावड़ी वरून एक कळशी भरून पाणी तिनं म्हाता-या जवळ ठेवलं .उगा सांड उबड़ नको करूस जरुरी असेल तर पी , असं सांगायला पण नाही विसरलीती त्याला.म्हाता-याची सोय लावून ती निघाली कामाला. पाउस आता पूर्ण थांबला होता.वस्ती ओलांडून ती पुढे निघाली. हमरस्त्याला लागुन असलेल्या कॉलोनी मधल्यानविन घरी कामे निपटवु आणि मग पुढे जावू असा विचार करत करत ती चालली होती.आणि तितक्यात तिला दिसले दोन मोठे बुलडोझर , वस्ती कड़े वळताना, त्याच्यामागे पोलिसांची मोठी निळी गाडी ...आणि त्यांच्या मागे एक काळी गाडी.बहुधा कोण्या शेठजिची असावी.... चानिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ....चानी तशीच वळली, वस्तीजवळ त्या सगळ्या गाड्या थांबल्या. पहीलेपोलिसांच्या गाडीतून भराभर पोलिस उतरलेत. त्यानंतर मागच्या काळ्यागाडीतून एक माणूस उतरला. धिप्पाड देहयष्टिचा, थोड़े पोटही सुटलेलं,डोळ्यावर काला गोगल घातलेला , आणि गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची चेन ,बहुधा शेठजी असावेत , कारण मागे होताच एक पिलांटू छत्री धरून मागेत्यांच्या.शेठजींनी एक नजर टाकली वस्तिकडे ... त्यांच्या नविन ले आउट कड़े... अचानकएक वा-याचा झोत आला , पलिकडच्या कच-याच्या ढीगावर मरून पडलेल्या अनसड्लेल्या कुत्र्याचा वास त्या झोताबरोबर नाकात शिरताच शेठजी कासाविसझाले , लगेच एक सुगंधी रुमाल पुढे आला.क्या गंदे लोग है , कैसे जीते है भगवान के बलासे ... चला रे उचला त्याझोपड्या पटपट... साले गलंग लोग ...लोक बोम्बलायला लागले ... पण कुणी पुढे यायची हिम्मत करी ना. पोलिस बघूनघाबरून गेले सगळे. जमेल तसं सामान जमा करायला लागले.चानीच्या हृदयात धस्स झालं. ती पळाली भरकन तिच्या खोपटाकडे. जमेल तसंसावडायला लागली, क्षणभर म्हाता-याला कळेच ना काय झालय ते. टकमक बगाह्त तोकिरकिरला... काय झाल वं चाने...काऊंन असी करतासं... पिसं लागलं का वं?चानीला बोलायला फुरसत नव्हती. म्हाता-या कड़े बघायला पण नव्हती फुरसत .भराभरा भांडी पोत्यात भरली आणि धावत जाउन वडाच्या पारावार ठेवून आली.म्हातारा खुरडत खुरडत खोपटाच्या दाराशी आला. परत खोपटात शिरत तिनंम्हाता-याची वळकटी उचलली आणि त्या बरोबर काही कपडे पण बांधले गाठुडयातआणि परत धावत जाउन ठेवून आली त्या पारावर. आता खुरडत खुरडत म्हातारा पणवडा जवळ पोहोचला , आणि टकमक टकमक बघू लागला.गणु पैलवान, बाबू सुतार च्या झोपड्या उखडून आता ते अजस्त्र धुड वळलं होतंचानीच्या वाडयाकडे! आपल्या खोपटावर फिरणारा तो नांगर बघून चानीच्याडोळ्यान्ना अश्रुधारा लागल्यात...वाढत्या शहराच्या गरजा भागवण्या साठी, उकिरडा संपवून तयार होणा-या ५७३व्या ले-आउट चं भूमि पूजन होणार होतं म्हणे.आणि त्याच वेळी अचानक धुवाधार पावसाला परत सुरुवात झाली ...

सुनील जोशी१७/०७/२०११

बरजोरी करो SSS ना आ आज SSS.....

बरजोरी करो SSS ना आ आज SSS ... आळवून आळवून परवीन शामकंस गात होती. बरेच दिवसांनी ते सुर कानावर पडताच तो गेला थेट त्याच्या त्या विश्वात ... एका राखून ठेवलेल्या त्याच्या त्या विश्वात. ते विश्व , त्यांन कधीच उघडून दाखवलं नव्हतं कोणा कोणाला.

हळूच उठला, स्टडीत पोहोचला समोरची ५ पुस्तकं बाजुला केलीत, आणि त्यांच्या मागे ठेवलेली ती डायरी ... १९८० सालची डायरी काढली. दिनाक २४ मे... एक लालभड़क वाळलेलं गुलाबचं फुल. त्याच्या त्या दांडी काट्या सकट जपून ठेवलेलं. हातही न लावता त्यांन आपलं नाक नेलं त्या गुलाबा जवळ, एक दीर्घ श्वास घेत त्या पार वाळलेल्या गुलाबाचा गंध त्याने श्वासात भरून घेतला. दोन अश्रु ओघळले त्याच्या गालावरून. दिवसभर अस्वस्थ राहण्यासाठी तो आता मोकला होता. त्या गंधानं त्याच्या मस्तकात

झिणझीण्या उठल्या. हळुवार पणे ती डायरी बंद करत तो जागेवरून उठला. डायरी परत आपल्या जागेवर ठेवली आणि मग डायरी आपल्या जागेवर ठेवून तो आला परत आपल्या बसण्याच्या जागेवर . बसला तिथे विमनस्कपणे शुन्यात बघत.
अत्यंत गजबजलेली ती चाळ. मुक्काम पोष्ट संगम चाळ , सीताबर्डी. दाराला लागुन असलेली दारं , एका घरातून दुस-या घरात सहज शिरणारी ती पोरं. नाईक, जोशी , बाजूला मुजुमदार , करमरकर ... नविन येणारा हमखास चुकायाचा , जोश्यांच्या ऐवजी नाईकांकडे शिरणार, पाणी पिणार, काकू चहा मांडे पर्यन्त त्याच्या लक्षात येणार ...काही तरी वेगळ दिसतय... तोपर्यंत नाईक काकु चहा आणणार ... सोबत जोशी काकांना सुद्धा बोलावणार. सगळे कसे एका कुटुम्बातले जणू .

वय वर्ष सहा. वर्ग पहिला. नाव श्रीकांत मनोहर मुजुमदार. इवलीशी मूर्ति, उंची साडेतीन फुट, आज अक्खी चाळ उभी आहे ... त्याच्या शाळेचा पहिला दिवस . नविन दप्तर नवा गणवेश घालून श्रीकांत तयार झालेला शाळेत जायला. आणि त्याला निरोप द्यायला उभी संपूर्ण चाळ.

बाबांचे बोट धरून शाळेत प्रवेशति झाली ती बटु मूर्ति. आजूबाजूचं वातावरण बघून गान्गारून गेलेला तो जीव . शाळेची घंटा झाली . त्याला शाळेच्या आत सोडून बाबा माघारी वळले. आणि आता आपलं कसं होणार ह्या भितिनं एकदम रडू फुटलं त्याला.

हळुहळु शाळेची सवय झाली . रिक्षा आली की तयारच असायचा. आता तर रविवारची सुट्टी पण नको असायची. शाला नाही म्हंटलं की रादयाला व्हायचं . कविता, पाढे ,गोष्टी, ह्यात रमायला लागला आता तो. खुप सारे मित्र पण गोला झाले होतेत आता . आपल्या नविन विश्वात रममाण झाला होता आता तो.

मनोहर मुजुमदारांनी सौंशी सल्ला मसलत केली आणि दीवाळीच्या मुहुर्तावर वर्धा रोड वर कर्वे नगर ला प्लाट च्या खरेदीचा मुहूर्त निघाला. संगम चाळीतलं घर तसं जुन्याच पद्धतीचं होतं, लहान पण पडायचं , म्हणून मग इकडे प्रशस्त बंगालाच घेतला बांधायला.

शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या इतर दिवशी स्वतः जातीने हजर राहून मनोहर त्या कामावरं देखभाल करायचा. आजूबाजू ला अजुन हवी तशी वस्ती पण नव्हती झालेली आणि रस्ते सुद्धा कच्चेच होते. कधी कधी बाबा आईला पण घेउन जायचे आणि मग अस्मादिक एक तर ..प्रश्नच नाही ...जावचं लागायचं. फार कंटाला यायचा , पण पर्याय नसायचा. कधी कधी मग तो कंटाला करायचा , जोशी किवा नाईक काकुंकडे च तो थांबुन रहायचा. आणि आई बाबांना जाऊ द्यायच चा. खुशाल...
पहिल्या वर्गाची परीक्षा झाली , श्रीकांत पहिला आला. आई बाबांना खुप आनंद झाला. अक्ख्या चाळीला पढ़े वाटलेत.

त्याच दिवशी संध्याकाळी मोट्ठ्या मोट्ठ्या पोथ्या , पुस्तक घेउन एक लांब शेंडीवाला माणूस त्यांच्या घरी आला . या या गुरूजी म्हणत बाबांनी त्यांचं स्वागत केलं . मग बरच वेळ बसून बाबा आणि ते चर्चा करत होते. मोठ्या मोठ्या चोपड्या उघडल्या , काहीतरी लिहिलं , गणितं केल्या सारखं ... मधुनच आई डोकावून जात होती. नंतर आईने गुरूजींना केशरी दूध दिलं.

यंदा श्रीकांत ला आठवं वर्ष लागलेलं आणि नविन घर पण बांधून पूर्ण झालेलं , श्रीकांत च्या व्रतबंध आणि नविन घरात गृहप्रवेश असा दुहेरी कार्यक्रम ठरला. सगल्या नातेवाईकांना निमंत्रण गेलीत, कार्यक्रमाच्या तयारिची सुरुवात झाली. मुहूर्तवडे ... वगैरे वगैरे, सगळे चाळकरी उत्साहान सहभागी होत होते त्या सगल्या कार्यक्रमात. श्रीकांत मात्र सुट्ट्या असल्याने मित्रांबरोबर खेळण्यात मग्न असायचा .

एक दिवस सकाळी सकाळी आजी, आजोबा, आत्या , काका ,काकु आणि त्यांची चिल्ली पाल्ली सगळे लोक घरी आलेत. दुपारी मामा, मामी, मावशी , आजोबा वगैरे लोक पण आलेत. आता घरात नुसता गोंधळ उडाला होता. आता श्रीकान्तला घरातल्या घरातच खेलायाला खुप सवंगडी मिलालेत.

दुसा-या दिवशी सगळे जण नविन घरी गेले. संगम चाळी पेक्षा हें घर खुपच प्रशस्त होतं . समोर मागे आंगण, मोठ्या मोठ्या खोल्या, प्रशस्त हॉल , कलात्मक बांधकाम, सगळ्यान्नी आई बाबांचं कौतुक केलं , अभिनंदन केलं. बाबा आणि आईच्या चेहे-यावर समाधान दिसत होतं .

२३ आणि २४ तारखेला मग जंगी कार्यक्रम झाला. चार दिवस आनंदाला उधाण आलं होतं जणू. २३ ला गृहप्रवेश आणि २४ ला व्रतबंध , छोट्याश्या श्रीकांतला खुप खुप मजा आली. चाळीतुन आता ते सगळे बंगल्यात रहायला आलेत. सगल्या बच्चे कंपनीला सुट्ट्या असल्याने मुक्काम आठवडाभराने वाढला होताच. पण नंतर हळुहळु एक एक जण आपापल्या गावी जायला निघालेत.

आता घरी फ़क्त , आजी आजोबा , श्रीकांत , आई आणि बाबाच उरले होते.
सदा गर्दीत रहायची सवय झालेल्या श्रीकांत ला आता इकडे फारच एकटं एकटं वाटायला लागलं इकडे फारशी माणसंच दिसेनात. आजूबाजू ला काही बांधकामं सुरु होती , तिथे खेलायला वाळु आणि काम करणारे मजूर येवढचं दिसायचं. वैतागुन जायचा श्रीकांत , आणि बर्डिला परत चला म्हणून मागे लागायचा .

मग रविवारी बाबांनी त्याला सकाळी सकाळी संगम चाळी मधे सोडून दिलं , दिवसभर खेळुन मग स्वारी जाम खुश झाली. संध्याकाळी बाबा घ्यायला आलेत तर श्रीकांत परत जायलाच तयार नव्हता. कसं बसं तयार केलं , सगळ्यान्नी समजावलं ... आणि मग तो तयार झाला कसा बसा..

साधारण १५-२० दिवस असे गेलेत . ३-४ वेळा श्रीकांत जुन्या घरी राहून आला दिवस दिवस भर.

त्या दिवशी त्यांच्या समोरच्या पूर्ण झालेल्या बंगल्या समोर एक ट्रक येउन उभा झाला. नेहेमीच्या वाळु गिट्टी च्या पेक्षा वेगळा होता हा ट्रक . त्यातून घर सामान उतरवत होते ते लोक आणि घरात नेउन ठेवित होते. श्रीकांत कौतुकाने बघत होता.

सामान ठेवून होता होता मागाहून एक कार आली, त्यातून एक बाई , एक मुलगी छोट्टीशी आणि एक माणूस असे ३ लोक उतरले आणि त्या बंगल्यात शिरले. सामन उतरवून तो ट्रक आता निघून गेला होता.

थोड्या वेळाने दारावर टकटक आवाज झाला. मघाशी त्या घरात आलेल्या बाई दार वाजवित होत्या. श्रीकांत च्या आईनं दार उघडलं . पाण्याची कळशी हातात घेउन दारात त्या बाई उभ्या होत्या.
पीनेका पानी मिलेगा ?
आईनं त्यांना आत बोलावलं , कळशी भरून पाणी दिलं, आणि म्हणाली ..चहाला या सगळे जण
त्या बाई म्हणाल्या ... अरे रहेने दीजिये चाय वाय क्यों तकलीफ करते हो?
आई म्हणाली तकलीफ किस बात की ... नविनच आलात ना ..तितकीच ओळख होइल , नक्की या .
पाणी घेउन त्या बाई गेल्यात...


साधारण पणे पाऊण एक तासाने मग ती मंडळी श्रीकान्तच्या घारी प्रवेशति झाली. गप्पा टप्पा सुरु झाल्यात. त्या आंटी अंकल ला श्रीकांत आवडला. आणि ती छोटीशी मुलगी , परवीन तिचं नाव बावरलेली वाटली. ज़रा गप्प गप्पच होती ती.

हम लोग नांदेड से आये. साहब का तबादला हुआ ... त्या आंटी सांगत होत्या.

आता बोलायला , खेलायला कुणी तरी बरोबरिचं मिळणार म्हणून श्रीकांत ची स्वारी खुश दिसत होती. परवीन चे अब्बा एम् आय डी सी ला होते. सकाळी लवकर जात आणि संध्याकाळी जरा उशीराच परतत. श्रीकांत च्या बाबांशी बोलून त्यांनी परवीन ला पण श्रीकांतच्याच शाळेत घातलं. दोघांच्या शाळेची वेळ आणि रिक्षा पण एकच होती. दोघांचं पटायचं पण खुप खुप एकमेकांशी. ती श्रीकान्तला श्री म्हणायची आणि तो तिला परी.
नावासारखीच होती ती. परी...

आता बरीचशी घरं पण झाली होती तिकडे. आणि हळुहळु लोकही रहायला येऊ लागले होते तिथे. ओळखपाळख होत होती सगळ्याची, खेलायला पण आता खुप जण होते, पण श्रीकांतचं परवीनशी जितकं पटायचं , तितकं इतर कुणाशीच नव्हतं पटत.

आता श्री दहावीला आला होता आणि परी ८ वी ला . दोघही आता शाळेत सायकलनी जात असत. एक दिवस असच शाळेत जात असतांना कुणीतरी टवाळ मुलाने परवीन ची खोडी काढली. श्री होताच मागे येत , त्याने त्या मुलाला मस्त बदडून काढले , मारामारी झाली तेव्हा रस्त्याने येणा-या लोकांनी मारामारी सोडवली. मग घरी आल्यावर बाबा पण रागावले त्याला. त्याला कळेचना का रागावाताहेत म्हणून.

आता तो अभ्यासात पूर्ण रमून गेला. परीक्षा झाल्यात , अपेक्षे प्रमाणे श्रीचे पेपर मस्तच गेले होते. आता वाट होती रिझल्टची.
रिझल्ट लागला. श्री बोर्डातुन दूसरा आणि शाळेतुन पहिला आला होता. सगल्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. बाबांनी जंगी पार्टी दिली त्याच्या या यशाची .. परी पण जाम खुश होती त्याच्यावर.

श्री आता बारावीला होता आणि परी दहावीला. करीअरचं वर्ष म्हणून खुप जोरात सुरु होता त्याचा अभ्यास. परी पण अभ्यासाला भिडली होती. कधी काही डिफिकल्टी आली की विचारायची श्री ला. आणि तो पण तिला समजावून सांगायचा खुपच सहजपणे . कसून मेहेनत सुरु होती दोघांची.

पाठो पाठ बारावी आणि दहावी च्या परीक्षा झाल्यात. कसून अभ्यास केलेला , त्यामुळे निकालाची चिंता अशी नव्हतीच. दोघे ही आता रिलेक्स झालेले होते. आई बाबांना सांगुन मग ते सिनेमाला जा , नाटक बघ असले उद्योग करायचे.

मस्त दिवस जात होते.

२४ में, श्री चा वाढ दिवस. त्या दिवशी सगळ्या मित्र मैत्रिणीन्ना श्री ने पार्टी द्यायचे ठरवले. सगळे मित्र जगत ला येणार होते. वाढ दिवसाची पार्टी म्हणून सगळ्यान्नी त्याला बुके , आणि गिफ्ट्स दिलेत.
परवीन ने मस्त लाल गुलाबाचे फुल दिले .
त्याला खुप खुप आवडले ते .

आज सकाळी सकाळी च परी धावत आली श्री च्या घरी ... अरे श्री उठ उठ ... तुझा रिझल्ट आहे परवा ... पेपर मधे बातमी आलेली आहे बघ ....

डोळे चोळतच श्री उठला ...आणि बघू बघू म्हणून त्याने तो पेपर तिच्या हातातून जवळ जवळ ओढूनच घेतला. अचानक ओढलेल्या पेपर मुळे परविनचा तोल गेला अणि ती पडली धप्पकन त्याच्या अंगावर ...

काय रे श्री किती धसमुसला तू ? कृतकोपाने परवीन बोलली. आणि अंग चोरत उठून उभी झाली.

ए ढमे माझा रिझल्ट सांगतेस ... आणि तुझ्या निकालाची पण तारीख आलेली आहे की . ती सांग ना ...

दोघांचे निकाल लागलेत. आधी १२ विचा ... त्यात श्री नेहेमिप्रमाने मेरीट मधे होताच... आणि ह्यावेळी १० वि मधे परवीन मुलिंमधे राज्यात पहिली आली होती. ... कालोनी मधे सगळ्यानी जयजयकार केला दोघांचा . दोन्ही घरात आनंदाला उधाण आलं होतं.

श्री ने व्ही आर सी ई ला मेक्यानिकल ला एडमिशन घेतली आणि परी ने ११ वि त शिवाजी ला . बाबा खुश होते त्यांनी श्री ला मोटर सायकल घेउन दिली आणि परवीन च्या अब्बानी तिला कायनेटिकहोंडा, ट्यूशन ला जायला लागेल म्हणून .

ए श्री तुला वेळ आहे का रे ...

का गं ... काही डिफिकल्टी आहे का?

हं ... नाही नाही डिफिकल्टी नाही तशी ..पण मला जरा गाडी शिकव ना ...
ओ के ... संध्याकाळी शिकवतो ... चालेल ...
हां चालेल ..

मग सुरु झाली शिकवणी . बैलेंस जमेपर्यंत तिच्या पाठी मागे बसून ह्यांडल धरायला पाठीमागुन बगले खालून त्याला पुढे हात घ्यावे लागले. त्यावेळी त्याला जरा अवघडल्या सारखं झालं, तो बावचळला ...पण परी बिनधास्त होती.

आजकाल एकटा असतांना त्याच्या डोळ्या समोर , मनात परीचाच विचार असायचा .

एकटा बसला असतांना श्रीला जाणवायचे तिचे आभास . त्याला व्ह्यायचे सतत तिचे भास् . मनोमन तिच्यावर प्रेम करायला लागला होता तो. त्याच्याही नकळत .
नुकताच २२ वा वाढ दिवस झाला श्रीचा ... त्या दिवशी पण नेहेमी प्रमाणे परी ने त्याला गिफ्ट दिले लाल गुलाबाचे फुल ...

आज एका मल्टी न्याशनल कंपनी ची appointment order श्री ला मिळाली. Executive म्हणून ... खुश होता तो ...
लगेच फोन वर त्याने परी ला सांगितले ... परी मी आता स्वताच्या पायावर उभा झालोय ...
घरी पोहोचला ...
तितक्यात परवीन चे अब्बा त्यांच्या घरी आले ..जवळ जवळ ओरडतच ... भाभीजी भाभीजी
अरे भाभी जी कुठे आहात ? खुश खबरी है ... कुठे आहात ...
करत करत ते थेट पोहोचले किचन पर्यंत ... आई कणकेचे हात घेउन बाहेर येत होती ... जवळ जवळ आपटणारच होती त्यांच्यावर ... पण वाचली....

क्या हुआ भाई साहब ...बड़े खुश नजर आ रहे हो...
अरे भाभी जी बात ही कुछ ऐसी है ... मुह मीठा करो ...
अपनी परवीन का निकाह तय हुआ है ...
अरे वाह ये तो बड़ी अच्छी खबर लाये हो ...
श्री ने ऐकले आणि जणू त्याच्या डोक्यावर आभाळच कोसळले....

एकदम सुन्न झाला तो ... एकदम चेहेरा उतरला त्याचा ...
और भाईजान आप भी सुनिए और एक खुश खबर ...
श्री का भी सिलेक्शन हुआ है ...
अरे वाह .... ये तो बड़ी अच्छी बात हुई ...
आता ते काय बोलाताहेत ते श्री ला ऐकू येईना ...

इतक्यात परी ची आई आली धावत ..धापा टाकत तिथे ...
आजे सुनते हो ... ये क्या हुआ... हाय रब्बा...
अभी अभी अस्पताल से फोन आया .... वो कहे रहे थे ... परवीन का एक्सिडेंट हुआ है ...

सगळे हबकले .... श्री ताडकन उठला...
कहा हुआ एक्सिडेंट आंटी जी ... और कौन से अस्पताल में है वो ...
धावत पळत सगळे जण दवाखान्यात पोहोचले...
पण उशीर झाला होता ...
तिची बैग घेउन अब्बा हमसा हमशी रडत होते...
बैग च्या आत श्री साठी घेतलेले ग्रीटिंग कार्ड ... आणि एक टप्पोरे लाल गुलाबाचे फुल होते...

आज पन्नासावा वाढ दिवस .... परत तेच सुर कानावर पडले .... परवीन सुलताना चे सुर ... बरजोरी करो ना ...आज ...

मजबूर करत होते .... जगायला आणि .... परत जगायला ...

वाटलं नव्हतं परी मला,

तुला कळलं कसं की मी तुझ्या वाचून जगु नाही शकणार ते ...

म्हणून का असं दूर जायचं निघून ... कसली ही बरजोरी केलिस ..परी कसली ही बरजोरी गं ...


सुनील जोशी
२१/०७/२०११

Monday, July 25, 2011

चैत्रपालवी....

चैत्रपालवी....

त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंड्यावर उगवलेली ती पालवी.... चैत्रपालवी.... वसंताच्या आगमनाची ती चाहुल. नवजिवनाच्या आगमंची हळुवारशी एक दस्तक. निसर्ग जणू प्रसन्नतेने करतोय उधळण आपल्या
सुष्टतेची. नवोदिताला जोजवत हळुवारपणे , हर्षोल्हासित करत सगळ्याना .... होतेय सुरुवात एका नवजिवनाची ...मोहकशी.

माझी नजर चुकवून आली होय तू?... तापलेला रविराज ... वाढलाय त्याचा तो जळफळाट. क्रुद्ध नजरेतून ओकतोय तो आग आता. बाळसं धरलेल्या पालवीलाही जाणवतोयं त्याचा तो जळफळाट. रांगणारं ते बाळ आता उभं होऊ लागलायं आपल्या पायावरं, आणि अत्यंत धैर्याने करतायं सामना त्या रविराजाच्या दाहकतेचा. ग्रीष्माच्या दाहकतेत , कधी गुलमोहोराला, तर कधी पळसाला, कधी निम्बाला तर कधी वडाला लपेटून प्रयत्न चालला आहे ...अणि तेहि अगदी आतून खोलवरून शोषत जीवन रस .... जगताहेत आणि जगवताहेत त्या वेलीला...

तो 'इश्वर', 'अल्ला' की 'आकाशतला बाप'.... मग हळूच हसतो , बघून त्यांची ती धडपड जगण्याची, बघून त्यांची ती आंस जगण्याची. टपकन ओघळतात दोन आनंदाश्रु त्याच्या डोळ्यातून. दाद देत त्यांच्या त्या जिद्दीला, धड़पडीला .... हर्षभरित तो गदगद होउन जातो आणि मग आपसुकच झारू लागतात त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रुंचे प्रवाह. वेड्या लोकांना वाटतं वर्षाऋतू आला.

मनमुराद पाझरतो, जीवनदान देतो,.... जगवतो आणि तगवतो , तो ही सृष्टि. पण कधी कधी आती हर्षित तर कधी अल्प हर्षितच राहतो तो अतिव्यस्तते मुळे .... आणि मग झरतो जास्ती कमी ... त्याच्या त्या कमी जास्त हर्षान, इकडे मात्र घडून जात असतं खुप खुप काही. .... अगदी त्याच्या सुद्धा नकळत.

त्याचं हसण आवरतं घेता घेता लक्षात येतं त्याच्या की पालवी आता पालवी नाही राहिलेली.
नवोन्मेशालिनी, नवोढा ...नवयौवना झालीय की ती आता. तिचं ते असं तारुण्यातलं पदार्पण सुखावून जतन धरित्रिला. अश्शी मिरवते, अश्शी मिरवते मग ती .... हिरवा शालू लेवुन वाट बघनारी नव वधुच जणू . ... तरुणाईचा तो जोश धुंद करून टाकत असतो सगळ्या सगळ्याना.

रागावून रागावून, तापून तापून , आता रविराज पण कधीचाच थकून गेलेला. बघत असतो कधी
आड़ोश्यातुन ढगांच्या , तर कालवून मान तिरपी, त्या हिरव्याकंच तरुणाई कड़े. त्याच्या बघण्यात असते शीतलता जो पसरवत असतो त्या चंद्र चांदण्याकडून. शरदाच्या चंद्र चांदंण्यान्ना जणू हळूच सांगतो कानात ..निवळलाय रे आता माझा राग.

सगळीकडे असते शांतता ... पहुडलेली असते धरा , हिरवा शालू लेवुन, साड़ी कामंधामं आटोपून वामकुक्षी घेणा-या सासुरवाशीणी प्रमाणे. शांत निवांत.
डवरलेला तो वृक्षराज , घनदाट सावलीचा तो हेमंती धनी. गारव्यात उगवणारी पहात आणि मग हळूच जाणवणारे ते उष्ण निश्वास , प्रियकराच्या बाहूपाशाताल्या त्या प्रेयसीचे जणू. सुरु असते एक तृप्त जीवन

हळूच येते एक वा-याची झूळुक . जाणवते त्यात थोड़ी बोचरीथंडी. हलवून टाकते, अगदी आतून.
वा-याच्या गतीची तीव्रता आती बोचरी होत जाते. वाढत्या वेगाची ती हवा ... त्या वाढत्या वेगाने हळूच विलग करते एक पान ... देठापासून ... आणि पानाला वाटतयं बिलगूनच रहावं . पांची धडपड बिलागायाची आणि वा-याचा प्राण जणू त्याला विलग करायचा. झालयं ...झालयं आगमन त्या शिशिराचं ..अगदी चोर पावलानी... अगदी हळूच.

बोच-या थंडीचा वाढलेला कडाका, त्यातच थंडीपासून संरक्षणा साठी पांघरलेल्यां हिरव्या शालिचं करतोय तो वारा हरण .... कसला हां दुष्टपणा .... निसर्गाचा की नियतीचा. थंडीचा हां कडाका अन त्यात हें
वस्त्रहरण ... पण जगायची आंस खुपच तीव्र असते नाही? आशेवाराच जगतोय ... अगदी निष्पर्ण ..अगदी निर्वस्त्र होउन ही. एखाद्या कडाक्याच्या थंडीत तपश्चर्या करणा-या प्राचीन तपस्व्या सारखा.

त्या उघड्या बोडक्या देहावर हळूच हसतो निसर्ग... निष्पर्ण झाडावर उगवते एक पालवी.
चैत्रपालवी ... सुरुवात करत निसर्गचक्राची ...नवजिवनाची ...

सुनील जोशी
२५/०७/२०११

Saturday, July 9, 2011

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण

‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ,
उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ?

त्या आजीचे वय आहे ८५ वर्षाचे. त्यांची दृष्टी अजूनही उत्तम आहे. श्रवणही
चांगले आहे. ऊस खाता येईल, असे दात आहेत. शरीर तसे धडधाकट आहे. त्या घरकाम आणि स्वयंपाकसुद्धा करतात. त्यांचा वीस वर्षे वयाचा नातू आजीची थट्टा करण्याकरता विचारतो,

आजी, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते ?
आजी : अरे, सूर्य नव्या रुपयासारखा चमकतो ना म्हणून. सगळी दुनियाच रुपयाभोवती फिरते ना. पृथ्वीचा काय अपराध ?
नातू : अरे वा ! आजी तू खूप शिकलेली आहेस.
आजी : छे ! छे ! असले काही अभद्र बोलू नकोस. मी चुकीचे सांगितले का ?
नातू : आजी, तू अगदी खर तेच सांगितलेस; म्हणून तर मी विचारले.
आजी : खरे बोलायला शिकण्याची काय गरज ? शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार,
शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना ? तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते. त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज ? खरे बोलणार्‍याच्या
जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेतले आहे ना !

आंतरजाला वरुन साभार .....

Saturday, July 2, 2011

बस्स झालं... आता... मी बोलणार ...

मला खुप खुप काही बोलायचं आहे. खुप काही सांगायचं आहे. सुरुवात कुठून करू ... काही कळत नाहीय्ये. बाबांच्या कड़क शिस्तिबद्दल सांगू , की आईच्या अवास्तव अपेक्षां बद्दल , ताईच्या हुशारिबद्दल बोलू की आजी अजोबंच्या So Called लाडान बिघडलेल्या माझ्याबद्दल.... डोक्यात प्रचंड गोंधळ उडालेला आहे ... पण आज अपुन बोल के रहेगा... जादा सोच सोच के साला दिमाग का दही हो रहेला है ...

आशय अभिमन्यु पांडे . वय वर्ष १८ पूर्ण . लोकशाहीत मतदानाचा अधिकार प्राप्त. यंदाच १२ वी पास झालोय . दहावी बारावी दोन्ही CBSE pattern मधून केल्यात. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा .. पण... हा पणच सगळा गोंधळ करतो ना .... दहावी ला ८९ % टक्के मार्क्स मिळालेत . एवढे मार्क्स मिळाले की सायंस च करायचं असतं ... आमच्या कड़े घर काम करणार्या रखमा बाई चं पण हें ठाम मत... उमलत्या कळीन कसं उमलायाचं ..माळी परिवार ठरवणार ....
अरे मुली सारखी मुलगी .. ती .. तुझी कृतिका ताई ... तिला जमते ..आणि तुला नाही जमणार ? ते काही नाही .. मुळीच ऐकणार नाही काही. तुला काही कळत नाही ... मी सांगते आहे ना ... तुला सायंस च घ्यायचय... आणि दिलय ना देवाने डोकं ..त्याचा कर रे वापर.... इति महामहिम मातोश्री ...

ए गधड्या... जास्त अक्कल नाही पाजळायची ... तू आपले पेपर सोडवतान्ना वापरतोस तेवढी पुरे आहे . म्हातार्यानी जास्ती लाडावून ठेवलय ना ... माजोरडा कुठला ... म्हणे सायंस नाही घ्यायचं ... भिकेचे डोहाळे लागलेत का? ... जास्ती आवाज नाही पायजेल ... गप गुमान सायंस ला एडमिशन घ्यायचे ..समजलं का? नाही तर फिर मै हु और तू है ... प्रचंड डरकाळी फोड़त पिताश्री गरजलेत.

ए शहाण्या ... काय लावलाय? का असा त्रास देतोय सर्व्याना? आपण अभ्यास केला ना की जमते सगळ. का छळतोस ... एवढे सगळे म्हणताहेत तर घे की एडमिशन सायंस ला. तुला काही कळत की त्यांना रे ... यूज लेस फेलो ... इति वंदनीय कृतिका ताई ...

का रे बाबा असा छळतोस? काय घोडं मारलय आम्ही तुझं ...कुठल्या जन्माचा वैरी आहेस रे... चार शब्द काय गोड बोललो ... की लगेच पलट्लास... सगळे कसे टोचू टोचू बोलतात रे आम्हाला ... ऐक रे ऐक जरा त्यांचं ..सायंस तर सायंस ... घेउन टाक रे एकदाची एडमिशन ....नको रे बोल लाउस उगा ह्या म्हातारपणी .. थकलो रे आता ... रामकृष्ण हरी... करवादत आजोबा बोललेत...

खर तर मी कलेचा भोक्ता . पाना फुलात, प्राण्या पक्षात रमणार मी... कळी उमलताना बघून आनंदाने नाचणारा मी ... समाजातल्या घटनांवर चिंतन करणारा मी ... निसर्गाच्या किमयेने चकित होउन व्यक्त होऊ पहाणारा मी.. त्या किमया ..त्या गोष्टी ... भुलावतात मला ... आणि मग सगळ्यानि कट केला ... अन त्यात माझ्या त्या दहावीच्या मार्कान्नी घात केला... जखडून टाकलं ह्या सगळ्यानि मला त्या नियमबद्ध वैज्ञानिक परिघात.

सगल्यांच्या आग्रहाखातर ... एकदाची सायंस ला एडमिशन घेतली . आणि पुढच्या दुष्ट चक्राला सुरुवात झाली . आई ने चंग बांधला ह्याला इंजिनियर च करायचा ... बाबांची त्याला सम्मति होती अर्थातच ... ताई आता तिकडे लांब होती ..पण दुरून तिचा रिमोट कंट्रोल सुरु होताच . ११ वितच माझ्या त्या ट्यूशन सुरु झाल्यात ... सकाळी ६ ते संध्याकाली ८ पर्यंत बिझिच बिझी. JEE , AIEEE , SEE, BITSAT चे क्लासेस पार थकून जायला व्ह्यायचं .

एक स्वभाव आहे माझा ...कदाचित दुर्गुणच म्हणा ना ... नाही म्हणता येत नाही मला ... कदाचित त्यामुळे ...येवडा थकून सुद्धा मी परत दुसर्या दिवशी सकाळी तयारच असायचा ट्यूशन ला जायला...
तसा दुर्गुणाची खाणच मी ... कोणी ही मोट्ठ्या आवाजात बोललं की घाबरून जाणे हां एक अजुन अवगुण. सरळ गोगल गाई सारखा कोशात चालला जातो मी. विशेषतः बाबा ...ते सुरु झालेत की ...मी कोमेजुन जातो . कसले ओरडतात. आतून म्हणावसं वाटते ...राहू द्या ना बाबा आता वाजले की बार .. (अर्थात आमचे हो). त्यांचं असतही बरोबर कधी कधी ... पण ह्याचा असा तर काही अर्थ नाही की आरडा ओरडा करुनच सगळ सांगावं ? आपली गोष्ट पटवून द्यायची एक पद्धत असते ना.. हीच ह्यांची पद्धत ... सतत हम करे सो कायदा वाली.. शुद्ध दादागिरी ... Autocratic Management का काय म्हणतात ना तसं जगायाची सवय झाली आहे आता

ही आमची मम्मी उर्फ़ माँसाहेब .. ह्यांची एक ठाम समजूत ... मी म्हणजे एक कुक्कुलं बाळ. मला काही समजतच नाही . तसा चार लोकात वावरतो मी पण ... पण सगळे कसे मला फसवायालाच टपलेले आहेत ..मला कळतच नाही आणि ते ... बिचारा मी... स्वताचा कुठलाच निर्णय घ्यायला मी लायक नाहीय्ये. चार लोकात सतत माझी लाज काढ़ते. सतत दाखले देते त्या कृतिका ताईचे ... ती कशी स्मार्ट आणि मी कसा वेंधळा हें सांगते अगदी आवर्जुन. I hate this comparison. I too am an individual entity. No one ..literally no one understand this. मग मला काही बोलावासच वाटत नाही. माझ्याकडे पण सांगायला खुप काही आहे ... पण ह्या ..ह्या उमलण्याच्या वयातच पार कोमेजुन गेलोय मी. कोणी समजावून सांगेल का ह्याना ...

आता हें पात्र ...कृतिका अभिमन्यु पांडे ... आमची ज्येष्ठा ...माझ्या लेखी ..ताईटली... चार वर्ष आधी जन्माला काय आली ..जणू सगळ्या जगाला शाहाणपणा शिकवायचा ठेकाच मिळाला जणू हिला. मी हिटलरला नाही भेटलो ..तो मेला म्हणतात ..पण मला खात्री आहे त्याच्या पुनर्जन्म झाला ह्याच घरात .. अभिमन्यु पांडे कड़े ... त्याच घरात मी पण जन्मलो ..एक ज्यू म्हणून ... अनायासे हिटलर ला छळ छावणित एक ओकारू सापडले . जगणे दुश्वार केलय ... आता जरा दूर काय गेलिये नोकरी करायला ... मी सुटकेचा निश्वास सोडला ..पण कसचं काय ... तिथून माँ साहेबांच्या मार्फ़त On Line छळ वाद सुरूच आहे ...

आजी आजोबा असतात घरात ... आई बाबा घरी नसले की आजी बोलावते हळूच ... हे हवय का ..ते घे रे ..करते थोडेसे लाड .. तेवढेच चार क्षण सुखाचे. A good old lady ... पण आई बाबा घरी अस्लेट की जणू त्यांच्याही प्रेमाचा झरा कसा आटून जातो. Poor Old Fellows.

बारावी सायंस झालो . स्वभावानुसार स्वताला झोकुन दिलं. पण एक नियति पण असतेच ना . किती हुशार असो ..पण नेमके त्या वेळेवर काय होते त्या वर खुप काही असते अवलंबून . रात्र रात्र जागुन अभ्यास केला. परीक्षेचा पेपर समोर आला ... आणि ऐन वेळी काही आठवेच ना. त्या पेपर मधले ते प्रश्न ओळखीचे वाटेतच ना. जणू आफ्रिकन आदिवासी माझ्या डोक्या भोवती फेर धरून आदिवासी नृत्य करू लागलेत .

पाच मिनिट डोळे बंद करून बसलो. देव आठवलेत . डोळे उघडून परत पेपर बघितला . आता थोड़ा ओळखिचा वाटला. ती अफ्रीकन भूतं थकली असावीत बहुतेक .. हळु हळु ताळ्यावर आलो .. पेपर सोडवायला लागलो .. सोडवत गेलो ..सोडवत गेलो ... वार्निंग बेल ..मग शेवटची बेल ... पेपर पूर्ण नाही झाला .. अपेक्षित यश नाही मिळू शकलं ... ना धड पास ना नापास ... चक्रव्युव्हात सापडलेला अभिमन्यु जणू ( इथे अभिमन्यु चा पुत्र..)

पेपर देऊन परत येत नाही तोच टोमणे सुरु. On Line पहिला टोमणा ... आळस नुसता आळस. चांस होता ..हुकवलास. आता बस भांडी घासत ... माँ साहेबांचा एक रिमार्क ... हाताने घालावलिस संधि .. बाबांसमोर उभे रहायची हिम्मतच नाही झाली . त्यांचं नक्की एकच वाक्य असणार ..खात्री पूर्वक .. खाऊन खाऊन माजला आहेस ..सांड नुसता ..कधी येणार अक्कल देव जाणे .
आता असं अपयश आलेला का मी एकटाच आहे? पण ह्या अघटिताची जबाबदारी तर मलाच घ्यावी लागणार ना. खरं तर जी माझी वाट नव्हती त्या वाटेवर मी मार्गक्रमण केलं. पाय रोवायची धडपड़ पण केली .... नव्हे माझ्या परीने यशस्वी पण झालो ... शिखर नाही गाठू शकलो ...ह्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो ... यशाचे सगळे वाटेकरी..पण अपयशाचा मी एकटाच धनि .. असचं जर जगण असेल प्राक्तनात ..तर काय अर्थ आहे ह्या जगण्याला .. का करायचं हे सगळ?
आता मी ठरवलयं ..बस आता नाही करणार हे सगळ ... नाही जगणार असलं बंदिस्त आयुष्य . झुगारून देणार ही सारी बंधन .. मुक्त होणार आहे मी ... आता बोलायला लागलोय ... आता करून पण दाखवणार आहे मी... बस ..बस ..बस..

बस्स झालं... आता...

सुनील जोशी
२६/०६/२०१०