Tuesday, May 31, 2016

अदृश्य

सुर्यास्ताच्या पडद्याआड
तू झालास साक्षात अग्नी
अन् त्या कुंडात घेतली उडी
मी... मी एकटीनेच

तू, तू होतासच अर्थात
साक्षात अग्नीरुपच् तू
आयुष्य जगलोच आपण
तेव्हा अन् आताही एकत्रच

त्या तरंगांवर दरियाच्या
आयुष्य होतो जगलेलो
खवळलेल्या लाटांवर पण खेळलो
आता शांतवलेल्या त्याच दर्याच्या

अंधारुन आलंय चोहिकडून
आणि त्या काळाच्या पडद्याआड
झालोय आपण अदृष्य जणू...
अर्थात सगळ्या जगासाठी

पण मी आहेच की रें
तुझ्यातच सामावलेले
कुंडात तुझ्या उडी घेउन
दृश्य जगातुन अदृश्य झालेले...

सुनील जोशी
३१ मे २०१६

Wednesday, May 25, 2016

ग्रहण आणि रूळ

रेलवेच्या रुळान्चा समांतर प्रवास
वर्षानुवर्षे अविरत सदा सुरूच आहे
अगदी सुरुवातीपासूनच त्यांना
एकमेकांना भेटीची आस आहे
सूर्य चन्द्र त्यांच्या तर
खुप आधीपासून आहेत
एकमेकांना भेटण्यासाठी
पाठ शिवणीचा खेळ त्यांचा
युगानुयुगे तसा सुरूच आहे

समोरा समोर जेव्हा येतात ते
तर मधेमधे ती पृथ्वी कडमडते
आणि सामना होण्या आधीच
एकाला ग्रहण लागुन जाते

सगळ होतं मग काळ कुट्ट
जणू लागते की काय त्यांना
एकमेकान्चिच अशी काही दृष्ट

पण आमचे रुळ तसे बरे आहेत
आस ठेवतात एकमेकांच्या भेटीची
पण हव्यास मात्र नसतो त्यात

कारण माहिती आहे त्यांना की
असला हव्यास पडू शकतो महाग
अपघात रूपी ग्रहण लागण्यापेक्षा
असं समंतार धावण बरय की

दुरून दुरून का होईना
एकमेकांच्या नजरेत तर असतो
अंतर ठेवून पण करता येते की
प्रेम ..अगदी युगानु युगे ....

सुनील जोशी
December 20, 2015

हे अन ते जळणे...


जळते ज्योत मंद दिव्याची
जळते अन चिता माणसाची
एक आणिते समाधान मुखावरी
आणि अन एक अश्रू नयनांतरी

दोन्ही जरी क्रिया जळण्याच्या
अन्तर सरळ दिसते जळण्यात ते
असे एक हे जळणे
अन असे एक ते जळणे...

प्रेमाग्नी जळतसे तो हृदयात
अन जाळी विरहाग्नी हृदयास
प्रेमाने जळालेला समाधानी
अन विराहाग्निताला तो दुखी

जळते जरी हृदय दोन्ही ठायी
अन्तर सरळ दिसते जळण्यात ते
असे एक हे जळणे
अन असे एक ते जळणे...

सुनील जोशी

Monday, May 23, 2016

 देशभक्ती....


आजकाल 'सीझन्स सेल' सारखी
ती देशभक्ती उफाळून येत असते
बदलत्या रुतुचा अदमास घेत घेत
.
.
.
काल तर रस्त्या रस्त्यावरून
सांडून सांडून वहात होती देशभक्ती
आणी आज एकदम महादुष्काळ
.
.
.
भाषणा जयजयकाराला आधार त्या पुतळ्याचा
कालचा चमकत असलेला तो पुतळा
आज कावळ्यांचे भार वहातोय
.
.
.
आजकाल देशभक्ती सवंग झालीय का?
मला उमाळे येतात तीचे दर सीझनला
उमळणा-या त्या सर्दी पडश्या प्रमाणे ....
.
.
.
आणी मी सुद्धा व्यक्ततो
त्या पडश्यातल्या शिंकरल्या सारखा
पुन्हा पुढच्या सीझनच्या आजारासाठी तत्पर तयार ...


सुनील जोशी
२७/०१/१६
एक खोज

एक खोज खुद की अपनी
भुले भटके खुदकी अपनी
सोचा ढुंढू अपने ही खुदको
उलझ गया ढुंढते मै खुदको
कभी पाया राधा माधव में खुदको
कभी वासना के दलदल में खुदको
कभी सुर वृंदावन की बांसुरी का था
कभी बेसुरां सूर मैफल का मैं था
समझ ना पाया यें या वो मैं था
उलझते हुए ऐसा जीये जा रहा था
आत्मांसे से फिर आवाज वो आयी
उलझन अब मेरी फिर दर हो गयी
मानव मित्र ये भी तू और वो भी तुहीं है
जिंदगी मौज में बस जी लेनी तुझको हैं
सुनील जोशी
२७-०१-२०१६
बेमान आसवें.....

आज माझ्या या उशीचे
रंग का पालटले?
आठवांत रमता तुझिया
गाली आसू ओघळलें
स्वप्न रंगी रंगलेलगंभीर
दिव्य तो सहवास गं
आठवे येता तयाची
वाहे आसवांचा पूर गं
ऐकुनी होतो आम्ही
बेरंग असती आसवें
स्वप्नरंगी रमता तुझिया
रंगली ती आसवें
कळत नकळत मजला
बेमान झाली आसवें
ओघळता त्या उशीवर
सत्य सांडिती ती आसवें
सुनील जोशी
१/२/१६
महिला दिन महिला दीन ….

साजरा करूया महिला दिन
अन् उद्या पासून महिला दीन
खरच करतोय का कदर
आपण आपल्याच प्रतिबिंबाची? ….1
पोळा आणी महिला दिवस,
साजरा करायचा एक दिवस,
आणि उद्याच लावायचं कामाला
परत राबणार्या त्या जीवाला, …..2
जिव्हाळ्याचे चटके लावायचे,
महिलांचा उदो उदो करायचा,
पण त्या समोर जाणार नाहीत
याची काळजी पूर्ण घ्यायची ……3
महिलांचे प्रश्न जमवायचे,
त्या कागदाची घडी घालायची
छान गुंडाळून ठेवून द्यायची
पुन्हा उघडायची पुढच्या वर्षीच …..4
छान मोठी भाषणे करायची,
मोठ्या मोठ्या गप्पा हाणायच्या
आणी दुसऱ्याच दिवसापासून
करायचं सुरू येरे माझ्या मागल्या …5
असा महिला दिन साजरा करायचा
स्वतःच्या पाठीवर थोपटून घ्यायचं
परत पुढच्याच दिवसापासून
बघायची वाट,पुढच्या महिला दिनाची…..6
सुनील जोशी
०८ मार्च २०१६
शोध....


कृष्णास शोधतो मी
राधेस शोधतो मी
डोहात यमुनेच्या या
शोधतो माझा मलाच मी ही
शब्दात शोधतो मी
अर्थात शोधतो मी
कवितेत माझ्या या
शोधतो माझा मलाच मी ही
छंदात बांधतो मी
बंधात कोंबतो मी
अंतरात माझ्या या
कष्टितो माझा मलाच मी ही
शब्दांत हरवलो मी
छंदात ना मी रमलो
कष्टलो फार जरी मी
न माझा मला गवसलो....
सुनील जोशी
०२/०४/२०१६

कृष्णा.....



कृष्णा ,
कधी विचार केलांस का रे?
मधेच असं गोकूळ सोडून
सगळ्यांना रडवून गेलांस की रे....
कृष्णा ,
प्रेम म्हणतात अत्युच्च असते ना रे
अरे या वेड्या राधेचं सोड
मनात यशोदेचा पण विचार नाही आला कां रे
कृष्णा ,
काय मिळवलंस देवा तू रे
मांडून असा सारा खेळ
सगळ्यांना रडवायला आला होतास का रे
कृष्णा ,
ऐकलयं असं की अवतारात
खूप महान कार्य करायची असतात का रे
मग माणसाच्या घरात तो जन्म का घेतो रे
कृष्णा ,
दूर केलस सगळ्यांना किती सहज तू रे
पण मुरलीला मात्र तुझ्या तू
अधरांवर अढळपद दिलंसच की रे.
सुनील जोशी

Tuesday, May 17, 2016

बाजारका एक फूल हूँ मैं मेरे नसीब का मारा हूँ
डाली से अब टूट गया दर दर भटकता फिरता हूँ
डोली को सजाता हूँ कभी जनाजेंसें लिपट जाता हूँ
प्रभू चरण छूंकर कभी गिडगिडाता हुआ एक फूल हूँ मै.....
खतम् तो उसी दिन हुआं मैं साथ जब छूटां था डालीसें
पर जाने सें पहले खुशबूं बिखेरता चला जाता हूँ मैं ......
जीवन युंही क्षणीक हैं यारों न जानें साथ कब छूटेगां
अंतीम क्षणों तक मगर यारों खुशबूं से नाता नहीं तोडूंगा
रहूं यहां या रहूं मैं वहां रहूं फर्क क्या पडना है
छिन लियें अगर डालीं मेरी खुशबू पर इतराते रहना हैं
सुनील जोशी