Saturday, February 20, 2010

शुन्य महिमा

एक टिम्ब एक शुन्य
वाढे शुन्य होई ब्रह्मांड
शुन्यातुनी आले अन
शुन्यची जहाले हें विश्व

शून्यासह ब्रह्मांड
शुन्याविण ब्रह्मांड
शुन्यवत ब्रह्मांड
शुन्य महिमा

शुन्यासी किंमत
स्वतःची न काही
परी वाढवी मूल्य
शुन्य इतरांचे

नवावरी नऊ शुन्य
होई नवकोट नारायण
जी परी सर्व इथेच सोडून
होई अन एक महाशुन्य

शुन्याने भागिले शुन्याला
जन्म अन अनंताचा जाहला
शुन्यातुन अनंत निर्मिला
असा शुन्याचा महिमा

राधे विन कृष्ण शुन्य
कृष्णाविन राधा शुन्य
कृष्णासह राधा ब्रह्मांड
अन ब्रह्मांड एक शुन्य

सुनील जोशी
१८/०२/२०१०

मी फिनिक्स.....

हस्ताच्या झरल्या धारा
धो धो बरसला तो घन
तन जाहले चिंब चिंब
परी मन कोरडेच राहिले
रित्या मनाला आस ती

ते अजुनी मृगजळ शोधते...

समाजबंधनी बंधित मी
उच्च स्थानी जावुनी बैसलों
नाना प्रकारे सन्मानित जाहलो
परीटघडित ही आज परी सारे
विस्कटल्या गत वाटते ...

भितीच्या त्या खोल डोही
बाल्य ते कसे हरवून गेले
अनिवार मी ऐसा बुडालो
अन काय सांगू ह्या सशाला
अजुनही भीती ढगांची वाटते

स्वप्न विश्वी विहरताना
मी स्वप्न होते पाहिले
स्वप्न ते केवळ स्वप्न उरले
परी ह्या सत्य सृष्टिने ऐसे
मला उध्वस्त करुनी टाकले..

फिनिक्स पक्षाचा वंशज मी
आज राख जरी मी जाहलो
नष्ट करण्या जरी त्यांनी
काहीच कमी ना सोडले
राखेतुनी त्या माझ्या मीच

उड़ण्या परत सज्ज जाहलो ....

सुनील जोशी
१४/०२/२०१०

दयाल तर होता येइलच ना..

एक महायुद्ध ... विनाश ...सर्वनाश ...
देश बेचिराख ...सर्वत्र दाणादाण ....

घेवुन स्वयंस्फुर्तिने देशाची आण
फिनिक्स पक्षाच्या अभिनिवेशान
राखेतून पुन्हा उभा झाला डौलान
उगवतिचा...बेचिराख झालेला जपान...

कासव गतिंने का असेना .. पण .. नियोजनबद्ध
विकासाची वाट चोखाळल्या जातेय इथेही.......
अगदी त्या दयाल (Robin) पक्ष्यासारखं ...

दूर दूर वरून एक एक काडी गोळा करत
चोचिन नीट जुळवत...........
अपना एक आशियाना बनानेका हां ध्यास

विकासाच्या वाटा चोखाळताना...असाच ध्यास

अब बंगला बना न्यारा
मग एक आस ... सखिच्या कौतुकाची ..
एका प्यार भरया कटाक्षाची........
छाती येतेय अभिमानान फुलून

स्वनिर्मित कलाकृतीचं कौतुक
आम्ही केलेल्या प्रगतिचं कौतुक
आणि मग पुढे जायला येतो उल्हास

एक अनामिक वादळ ...अगदी अचानक...
नष्टचर्याची चाहुल...आशियाना ढह गया...
दयाल अचंभित...स्तिमित..पण हताश नाही झाला
परत सज्ज झालाय एक एक काडी जमवायला

अघोषित युद्ध... कुणाचं? कुणाशी?? काळात नाहीय्ये काहीच
बेचिराख नाही झालो ..पण वणवा पेट्लाय...
दिल्ली , जयपुर , बंगलोर , मुंबई, अहमदाबाद ......
आणि अगदी काल परवा पुण पण ...

सावरावं तर लागेलचं ना... मलाही सावरायचं आहे
मेरा आशियाना फिर बनेगा ..पक्का बनेगा...
आम्हाला अगदी फिनिक्स व्हायची गरज नाहीय्ये
पण दयाल तर होता येइल ना..
पण दयाल तर होता येइलच ना..

सुनील जोशी
१६/०२/२०१०

मन आठवांत दंगते....

शब्द तव पड़ता कानी
मन आठवांत रंगले
मोरपिशी दिवसांची शपथ
मन आठवांत दंगले....

रूप तुझे स्मरता नयनी
मन गोकुळी ते विहरले
राधे तव सौंदर्याची शपथ
मन आठवांत दंगले....

दाट विपुल केशसंभारी
मन मोगरी गं विराजले
मोगर्याच्या त्या बहराची शपथ
मन आठवांत दंगले....

मंजुळ तव पैंजण रवे
राधे गं मन हे भाळले
रित्या माझ्या मनाची शपथ
मन आठवांत दंगले....

सुर माझ्या पाव्याचे
तव गोकुळी गं विहरले
पाव्याच्या त्या सुरांची शपथ
मन आठवांत दंगले....

तुझ्या दुक्खाची सल
अजुनही हृदयात गं उठते
आठवणीच्या काळोखकाहुरांची शपथ
मन आठवांत दंगते....

राहिले दूर अता गोकुळ
राधे ..मन परी तुलाच गं शोधते
उदास खिन्न काळजाची शपथ
मन आठवांत दंगते....

सुनील जोशी
१४/०२/२०१०

तू फ़क्त हो म्हण

कुणी म्हणतोय चंद्र आणेंन
कुणी कदाचित सूर्यही आणेंन
बघुच आपण काय काय ते ....
तू फ़क्त हो तर म्हण .....

अग मी साधी कविता पण
नाही आहे मला जमत!!....
चंद्र सुर्याचे वायदे कसे करू?
तरी तू फ़क्त हो तर म्हण ....

आता जे करण्यासारखं आहे मला
ते तर मी करतच असतो की ....
कळतय तुला ते.. पण ...
पण तू फ़क्त हो तर म्हण ....

आता कळुन सुद्धा तुला
तू जर कळुनच नसशील घेत
तर मी तरी काय करणार ना?
फ़क्त वाट बघेन तुझ्या त्या होकाराची...

म्हण ना गं ..एकदा तरी ...तू ..फ़क्त...हो.. तर.. म्हण...

सुनील जोशी
१२/०२/२०१०

तू मुलगी आहेस म्हणून.....

तू मुलगी आहेस म्हणून का
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा?
तुझ्या येण्याने ह्या जगात
होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं?

अगं.... आजची तू माझी कन्या
माझ्या उद्याच्या नातवांची आई
काय सांगावं कदाचित उद्याच्या
सुपर हीरोज ची असशील तू आई

राम,कृष्ण, पैगम्बर अन येशु
शिवाजी, गांधीजी की असो इंदिराजी
सगळ्या सगळ्याना एक आई होतीच की
नसतं तिला जन्मू दिलं आम्ही ....
तर इतिहास घडायची शक्यताच नव्हती...

इतिहास आम्हालाही घडवायाचा आहे
आणि घडवायाला तो इतिहास
एक माय प्रसवाविच लागणार आहे....
उद्याच्या स्रुजनाकरिता की...
उद्याच्या जगाला जगवायालाही ....
आम्हाला माय ही लागणारच आहे

म्हणून ...आणि म्हणुनच....
तू मुलगी आहेस म्हणून
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारणार नाही

ह्या जगाला जगवण्या साठी
मायेची पखरण करण्या साठी
नव निर्मितीच्या सृजना साठी
तू ये... तू ये .. तू ये..
बालिका तू आजची
माता अनंत कालाची ....

सुनील जोशी
२७/०१/२०१०

कळतय काय तुला?

कळतय काय तुला?
हां भिरभिरणारा वारा
हे सैरभैर माझे मन
वाट बघून शिणलेलो मी
आणि अगदीच निर्मोही तू
कळतय काही तुला?

आता कळुन घ्यायचच नाही
असं ठरवलचं असेल तू
तर मी तरी काय करणार?
सोंग घेतलंच असेल झोपेंचं
तर तुला जाग तरी कशी येणार?
कळतय का तुला?

अगं बघ जरा डोळे उघड
बघ तरी जरा .... तो वारा
जरा खट्याळ ..
अगदी माझ्या सारखाच....

कळतय ना आता तुला?

सुनील जोशी
२६/०१/२०१०

गुनाह और मुहब्बत.....

तो, ती...एक वातावरण ....
प्रेमिकांना यावं स्फुरण
गुज करायला हवाय एकांत
मनोमन समजुन घ्यायची कामना

बाग़ ती तशी वर्दळीची ...
असते तशी गर्दी ...
आपले पण कोणी भेटू शकतात
मग त्यातल्या त्यात शोधला एकांत ...
समजुन घ्यायला एकमेकांना ...

आणि तितक्यात पड़तेय धाड़
दोघेही आतून हादरलेले...
आता घरच्याना कळाले तर ??
छुप छुप के होते ना सगळे....

तसंही ........
छुप छुप के किया जाएँ वह गुनाह है
सरे आम करो तो वह मुहब्बत होती है .........

सुनील जोशी
२६.०१.२०१०

माह्या मातीत विदर्भाच्या......

वर्हाडाच्या माह्या मातीत
आहे पांढर्या सोन्याची खान
म्ह्मम्मै वाल्याइनि हो पहा
केलि त्याची निरा धुयधान

शेतकरी राजा हो माहा
राब राबते अथी दिन रात
परी त्याच्याच नशिबाले
लगे आत्महत्याइच हो ग्रहन

वर्हाडच्या हो ह्या मातीत
असे काळ्या सोन्याची बी खान
बनवतो इज अथी आम्ही
अन मारे मजा म्ह्मम्मै आन पून

सोम्या गोम्या येते म्ह्मम्मैचा
शिकवते आनी शहांनपन
मारते बेवडा म्हणे राजा आमचा
आत्महत्येचे हें म्हणे कारन

वर्हाड च्या ह्या मातिले
असे आवभगतिची जी जान
पर ऐकू ऐकू काही बी
आता किटले हो आमचे कान

आता आली हो घटका छान
घेऊ आमचं वर्हाड आम्ही अन
चला एकिन मिळून सारे
फुलवु विदर्भाचे नंदनवन ....

जय विदर्भ

सुनील जोशी
२०/०१/१०

मी एक वृक्ष ....

पथिक तो क्षीण जर्जर
शोधत आसरा निवांत
पखरून मायेची सावली
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

जाणूनी त्याची क्षुधा
मम वंश विस्तारक फल
अलगद अवतरवुनी सामोरी
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

येणार एक आप्त त्याचाच
करण्या संहार माझा उद्या
परी समाधान मनी हें की
जगलो जगविण्या त्याच्याच गोताला
जगुनी क्षण तो जगविण्याचा
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

देऊनी आसरा त्याला
जरी तो गोत त्या संहारकचा
मनोमनी सुखावलो मी...
जाहलो धन्य...
मी एक वृक्ष ....

जीवन जगता जगता
अन शेवटच्या ही क्षणी
करिता कार्यासी माझ्या
आनंदलो मी ....
मी एक वृक्ष ....

मी एक वृक्ष ....


सुनील जोशी
१७/०१/२०१०

आला क्षण ...अन..गेला क्षण ...

क्षण आजचा तो भला
येणार तो येइल क्षण
अन जाणारा जाईल पण
म्हणाल मग
आला क्षण गेला क्षण

येऊ घातल्या त्या क्षणा ची करीत चिंता
की गेल्या त्या क्षणाचा करीत शोक
का घालवितो व्यर्थ वाया आजचा
हां आजचा रे क्षण ....

होइल आज काल उद्या
अन काल होता उद्या गेल्या परवाचा
ना जाणुनी ह्या खेळाला
म्हणत राहिलो केवळ
आला क्षण गेला क्षण

क्षण येतील अन क्षण जातील
परी जगुनी एक एक क्षण
करू या इतिहास प्रत्येक क्षणाचा
अन मग ना म्हणू की आपण
आला क्षण ...अन..गेला क्षण ...

सुनील जोशी
१८/०१/१०

रुसलेली कविता ....


बारा स्वर अन बत्तीस व्यंजन
त्यातले लाडके माझे र अन ट
कारण अगदी सोप्प अन सरळसोट
अरे लावा र ला र अन ट ला ट
छापून टाका एक कविता सरसकट .

काय झालयं पण आज नाहीच कळत
र अन ट ची जुगलबंदी आज नाहीच जमत
जुगलबंदी नाही जमत अन मैफल नाही रंगत
बेरंग मैफलीत मग जानही नाही येत ......


बेजान मैफिलीतला मी एक मी खांब
रुसलेल्या कवितेची समजूत कशी काढू सांग?
रुसलेल्या कवितेची समजूत कशी काढू सांग?

सुनील जोशी
२०/११/०९

पंचम वर्जुन ही जगणे.....

वर्ज्य पंचमाचे दान जे रे
मागितले होते तुज सखया
पंचम नव्हता तो भुपातला
वर्ज्य तो पंचम मारव्यातला

मारव्याने रे काय केले
आर्त सुर संध्येसी जागविले
अन मम जीवनी रे सख्या
ते सुर होते अवचित लागले

विचार केला बहु मनी की
का आर्त हा रे मारवा
भासला अन गवसला मग
वर्ज पंचम त्यातला.......

वर्जिता त्या पंचमासी
मारवा तो आर्तला.....
स्वीकारुनी का भूपा तयातें
आनंदघन मग जाहला?

जीवनाची मैफल ही
रंगली होती तशीच...
वर्ज्य पंचमाच्या आग्रहे
परी बेरंग का ती जाहली ?

नको आता सुर सखया
आणि ताल ही ना जीवनी
शिकले आता रे जीवनी ह्या
पंचम वर्जुन ही जगणे.....
पंचम वर्जुन ही जगणे.....

सुनील जोशी
२८/११/०९

वर्ज्य पंचम .....


आठवतयं तुला
त्या मैफिलितला
तो मारवा......
सांज समयी रंगलेला

मी व्याकूळ, घनव्याकूळ
तृषार्त जन्मजन्मांतरिचा...
अन् राधा होवुनी तू आलेली
तृप्त करण्या त्या मोहना.....

त्रुप्तिचे मग वरदान लाभता
काय मागीतलेस ?

होते ते वरदान की शाप
अजुन ही न सुटलेले कोडं

मागितलास तू वर्ज्य पंचम
त्या मारव्यातला
वर्ज्य पंचम .....

शोधतोय अन् अजुनही
मी देऊ काय तुला
मी देऊ के तुला???

सुनील जोशी
१७/११/०९