Sunday, August 3, 2014

मारवा ....नवा ....



हेमंती  उष्ण हवा
संध्या ल्यायली साज नवा
रात्रीच्या गर्भात गारवा
रंगु दे बेभान मारवा

हेमंती  उष्ण हवा
मिठीतला तुझ्या विसावा
सखया लावी वेड जीवा
भिनु दे गात्रात मारवा

हेमंती  उष्ण हवा
हर्षी मनी अबोल रावा
मौनास आज अर्थ नवा
जुन्याच स्वरांचा मारवा

हेमंती  उष्ण हवा
जुना स्पर्ष होतसे नवा
सृष्टीचा जणू स्पंद नवा
उत्तर रात्रीचा मारवा

हेमंती उष्ण हवा
ना जगलो ऋतू बरवा
उमगे आज नवा नवा
नाही जगलो जो मारवा

सुनील जोशी
२४/११/२०१० 

मी एकटा.........


अगणीत ते शुक्राणु
फळणारा मी एकटा
नवमास त्या गर्भात
वाढणारा मी एकटा

घनघोर दाटलासे
अंधार येथ आहे
अंधारात ही घेतसे
आकार मी एकटा

मातृत्वाचे मातेला
मिळणार असे दान
देण्यासी असे ते दान
येणार मी एकटा

सुख दुःख वाटण्यासी
जमती गोत सारे
पऱी मी एकटाच येथे
माझ्या जगात आहे

सुनील जोशी
२/११/२०१०

जगावे आयुष्य हे वर्तमानात.................



गेला तो क्षण गेला...गेला
त्याचा बहु विचार कशाला

अन् येणारा ही क्षण नाही अपुला
त्याचा ही करावा विचार कशाला?

क्षण वर्तमान तो खरा भला
कार्य भाग मम साधण्याला

गेला क्षण उपयोगी कसा मला
केलेल्या चुकातुनी काही शिकण्याला
अन् येणारया क्षणांना सुरेख बनविण्याला

आजचा आज उद्या होईल काल
जगलो नाही तर हळहळून उपेग ना मग होईल

काय करावे मग सांगा स्वताला
भूतात रमावे की व्हवे रममाण भविष्यात

वाटे मला जगावे आयुष्य हे वर्तमानात ....
जगावे आयुष्य हे वर्तमानात.................
जगावे आयुष्य हे वर्तमानात.................

सुनील जोशी

१६/०६/०९ 

मी एक जोकर ....



मी एक जोकर पत्त्याच्या डावा मधला
रमीच्या डावात तोंडी लावायला
कुठे ही कसाही वापरून घ्यायला
तक्रार करणे नाहीच कधी जमायला

मी एक जोकर सर्कस मधला
मधल्या वेळात टाइम पासला
आपले अश्रुं लपवून टाकलेला
आणि हजर.. हसवाया तुम्हाला

मी एक जोकर धकाधकिच्या जीवनातला
नियतीच्या तालावर सिद्ध नाचायला
नाचता नाचता थकून गेलेला
जीवनाचा ध्यास पण अजुन नाही सोडला

जोकर पत्त्याच्या डावा मधला
जोकर सर्कस मधला
जोकर धकाधकिच्या जीवनातला

जोक कर ....
स्वतः वर हास
दुनियेला हसव...
स्वतःला लपव

शेवटच्या घंटे नंतर ...
परत आहेच की ..मग
माझे आयुष्या माझे नसलेले
माझे आयुष्य ...
मेरा नाम जोकर चे ....

सुनील जोशी

एक विनवणी



प्रणयातल्या त्या शपथा
आज तू आठवुनी जा
दिल्या घेतल्या वचनातें
आज तू निभवुनी जा

इष्कात धुंद मी अन्
इष्कात धुंद तू ही
उतरता धुंद आज ती
वायदे निभवुनी जा

प्रिये प्रियतमे सखे गं
गुंतलो असा मी
शोधुनी सापडे अता ना
वाट ती मुक्ततेची

विनवितो तुला गं
सखे आज वारंवार
अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवुनी जा
ती रात्र तू सोडवुनी जा...

सुनील जोशी

सखी माझी..





सखी माझी असते कधी कठोर
भासते अन कधी दुर्गेचा अवतार

कधी होते ती मधाहुनि मधुर
बावरतो मी बघुनी तुझे ते रूप

कधी असते ती बहर तो वसंतातला
कधी होते ती दाह त्या ग्रीष्मातला

कधी करते ती घन घन घोर  वर्षाव त्या  मायेचा
होते अन शीतल चांदणे जणू ऋतू शरदाचा

कधी हेमंतातली हेममयी  ती  उष्ण हवा
अन कधी थकलेला निष्पर्ण तो शिशिर सखा

असते ती अश्या विविध रंग ढंगात
परी असते ती सखी या एकाच त्या वेशात

लाख बहाणे सांगेन जरी मी नाना
परी गाईन मी सखे तव सुखाचाच तराणा


सुनील जोशी
१४ जानेवारी २०१४

एक स्वप्न ... सखीचं !


मी बघायला शिकलोय आता
एक स्वप्न
स्वप्न सखीचं...

कधी कधी अगदी दिवसाउजेडी
बघत असतो मी ते स्वप्न
स्वप्न सखीचं

स्वप्नात असो कि दिवास्वप्नात 
जगत असतो मी
स्वप्न सखीचं

ती ना,  नसते मैत्रीण
आणि नसते ती प्रीत
असते ती स्वप्न सखी

नात्यात अन बंधनात
नसते ती अडकत 
पण स्वप्नात यायला
मात्र नाही कधी  ती चुकत

भेटून तिला स्वप्नातही 
असतो मी खुश 
स्पर्श अस्पर्श सगळ वाटत झूट
असतं मात्र एकच खर
स्वप्न  सखीचं  .... स्वप्न  सखीचं 



सुनील जोशी
१४ जानेवारी २०१४

नाते......


काल रात्री मम स्वप्नी आला ...
साक्षात् परमात्मा ..
राधेच्या गोकुळीचा नंदलाला ....
होती राधाही सोबतीला ...

बघता गोकुळीच्या या अद्वैताला ....
मनी संतोष अपार झाला .....
मनाशी बांधून खुणगाठ ...
विचार केला करुया बोलते ह्या दोघांना ....

भगवंता तू जरी कान्हा विश्वाचा ,
तान्हा यशोदा माउलीचा ....
सारथी त्या पार्थाचा......
परी ना कले मज पामरा 
कोण तू ह्या राधेचा....कोण तू ह्या राधेचा ???....

गूढ़ हसुनी तो बंसीधर वदला.....
वत्सा ,अरे मलाही नाही रे कळले ,
कोण मी ह्या राधेचा.... 
कोण मी ह्या राधेचा???....

हृदयाशी रक्ताचे जे नाते ....
श्वासाचे जीवनाशी जे नाते...
लवणाचे जेवणाशी जे नाते ...
गोकुलीच्या राधेशी ते माझे नाते.....

मी वळलो स्वप्नातच राधेकडे..
प्रश्न विचारावा म्हणुन बघितले....
राधेचे ते सलज्ज डोळे....
किन्चितश्या पाणावलेल्या कडा....

शब्दही ना वदता ...
सांगुन गेले काय ते राधेचे कृष्णाशी नाते...
काय ते राधेचे ...
 श्रीकृष्णाशी नाते...

सुनील जोशी
१८/०९/२००९

काही चारोळ्या .....


१. अक्षर अक्षर जोडिले
शब्द शब्द जुळविले
ओतुनी भाव शब्दात त्या
अव्यक्त व्यक्त जाहले ....

सुनील जोशी
०४/०४/२०१२

२)
व्याख्याच स्वतःची
अवघडत जात आहे
कळेना मलाच माझे
नेमका कसा मी आहे

सुनील जोशी
०४/०४/२०१२

३)
तुटलेल्या फांदीला आता
कावळ्याचिच वाट आहे
शहाणा कावळा मात्र आता
त्याच फांदीला टाळतो

सुनील जोशी
०४/०४/२०१२

४)
मोडले तर आहेच रे मी
एका धक्क्याची वाट आहे
बिना धक्क्याने ही पडेन रे मी
तुझ्या स्पर्शाची आंस आहे ...

सुनील जोशी
०४/०४/२०१२
5. )

प्रेमात तू वागत असतेस
अगदी क्षितिजा सारखी
वाटते तू जवळ यावीस
दूर पळतेस अगदी क्षितिजा सारखी....

सुनील जोशी
०५/०४/२०१२

सांडले चार थेंब पावसाचे
अन धरेला आली तरारी
सोडला एक निश्वास चिंब
अन अवचित दरवळला मृदगंध.....

सुनील जोशी
२१/०४/२०१२
 
 मृत्यो अरे येऊ नको
ऐसे कधी मी बोललो ?
सरणावरी चढूनीही
उन्मुक्त मी रे हासलो
 
 
 दिवसाच रात्रीचे वार झाले
एका कळीचे फुल झाले
कोमेजल्या त्या फुलास कळले
आता जगणेच बाकी राहिले


मृत्यो तुला उगा बदनाम केले
या जगण्याने ऐसे छळीले
सरणावरी आज उमजले
मरून जगणे बाकी राहिले
 
 आभाळातील आटले पाणी
नळातील हि आटले पाणी
दुष्काळ भारी हा असा कि
डोळ्यातीलहि  आटले पाणी

 सुनील जोशी
१७/०३/२०१३
 
 1.
पायात सुखाचे पैंजण रूणझुणतांना
अवचित रुततसे कंटक त्या पायांना
हसता हसता रडणे असेल प्राक्तना
कां खेळविसी खेळ असा रे नंदनंदना
 
 1.
पापणित तो लपून बसतो
माझा एक आसू ही तो असतो
जागे पणी तर नाहीच नाही
पण स्वप्नात ही तो सोडत नसतो...

2.
तृप्तता जळण्यात नसते
तृप्तता हसण्यात नसते
तृप्तता मनात असते
आपलीआपल्यालाच शोधायची असते

3.
व्यक्त मी आणि अव्यक्त ही मीच
बंधनी मी आणि मुक्त ही मीच
माझ्या मनाचे हें खेळ सारे
अडकलो असतो त्यातही मीच

4.

हसताना आपण मनमोकळ हसावं
रडतानाअगदी धाय मोकलून रडावं
करायचं ठरवतो ना जे आपण, असं करावं
जगताना कसं... असं दिलखुलास जगावं



सुनील जोशी
२१/१२/११



अमर कथा भूतली साकारली
कि उगा राधा बदनाम झाली
कळले न कळले जरी त्या राधेला
सहज ती कृष्णात रममाण झाली

सुनील जोशी

अपूर्ण...


पौर्णिमा उद्याची ती
आज माझ्या सन्मुख होती
सौंदर्याची मुक्त हस्ते ती
उधळण जणू करीत होती

अदांनी मादक तिच्या ती
मोहवित मजला होती
इमानाची माझ्या जणू ती
सत्व परीक्षा घेत होती

पुनवेच्या चंद्रासम छबि ती
चिंतातुर परी भासत होती
हतबलशी अन दडपणात ती
ग्रहणाच्या जणू जगत होती

आठवली मग चंद्रकोर ती
जी अपूर्णशी, चतुर्दशिची होती
मुक्त सावटातुनी ग्रहणाच्या ती
खळाळुनी मुक्त हसत होती.

असेल जरी अपूर्ण किंचित ती
तेजाने परी ती झळाळत होती
अन अपूर्णतेतही समाधान ती
चंद्रकोर भरभरून जगत होती

पोर्णिमेच्या पूर्ण चंद्राची आता ती
वाटते मनोमनी मजला भीती
चतुर्दशिची अपूर्ण जरी ती
चंद्रकोरची लाविते मज प्रीति

सुनील जोशी
२०/१२/२०११

बहाणा....

बहाणा....


सांगायचे ते बरेच आहे
बोलायचे ही बरेच आहे
परी शब्द रुसले मजवरी
सांगू मग मी काय तरी ?

त्या फुलाचा तोच रंग का
त्या फुलला तोच गंध का
काय नियतीच्या अंतरी त्या
समजले का कोणातरी..??

मीच तुला का भेटलो ?
का तूच मला गवसली?
प्राक्तनात घडले असेच का
मम बुद्धीच्या ते बाहेरी

उत्तरे नसतात अपुली
शब्दही नसतीच अपुले
त्याच वेळी येई बहाणा....
सांगेन मी केव्हातरी ...



सुनील जोशी
२१/११/१० 

माहं साजरं शिवार....



काली माती
जमीन कसदार
मेहेनतिले चोख
सारे घरदार
व्हते माह्या अथी
माहं साजरं शिवार ...

जोड़ी सर्जा राजाची
महेनत घरदाराची
एकी व्हती सा-या घराची
फुलवित व्हती तवा
माहं साजरं शिवार.....

कसी दीठ लागली
कोन्या बुहा-याची
फे-यात सावकाराच्या
जमीन बी अडकली ....
घरधनी गेला अवचित...........

आन सुकून गेलं आता
माहं साजरं शिवार....

सुनील जोशी

९/११/११ 

मजला सराव नाही ...




दुःखास सोसण्याची
इतकी सवय झाली
सुखात झोपण्याचा
मजला सराव नाही

माझ्याच त्या व्यथा
अन माझीच जरी कथा
मांडणे बाजार त्यांचा
माझा स्वभाव नाही

आकाश पांघरोनी हें
जगतो असा काही
बंदिस्त कोठडीतला
आता उरलो मी नाही

करू मी काय आता
दुःख हें दूरदूर जाता
दुःखाविना जगण्याचा
मजला सराव नाही ...

सुनील जोशी
२१/०८/२०१० 

DOWN THE MEMORY LANE


While goin' through my diary Old
I found there a treasure of Gold
Memories are like the Gold
When the are Old Old  n Old

I found a Dried Rose
embedded in the Pages
A dried Rose ...but ..
But with Fresh Thorn.

I couldn't resist self
tried to touch the same
Alaas ....
The moment I touched it..
the throne pricked ...

I was in tears...
Just Reminding  ...
The Parting Party ...

Now only the Dried Rose ... N mee
Enjoying The Prick ...
Heavenly Prick of the Thorn
The Dried Rose with still Fresh Thorn...


SUNIL JOSHI


(Written on A Day Filled with Tears )

कोहरा मेरा ....


कोहरे कि चादर ओढ़े हुए
वो सुबह का आना कुछ ऐसे
घूँघट ओढ़े छिपते हुए
जानम आना तेरा जैसे

सूरज धीरे चढ़ते हुए
चादर हटाये कुछ ऐसे
आगोश में मेरे आने पर
सरके घूँघट अब जैसे

कोहरा हो तुम ऐ जानम
घूँघट में छुपी हो कुछ ऐसे
चढ़ता सूरज बनके मैं
सरका दू घूँघट जैसे तैसे ....

सुनील जोशी
२९/१२/११

रामा ....


.

अनुदिनी अनुतापे मनी ही अशांतता
सुटण्या त्यातुनी मी तडफड़ता
शांतवी मम चित्ताची अस्थिरता
रामा तुझे कोमल नाम घेता

सैरभैर मन माझे होता
कळे ना कसे आवरू त्या
वाटे शांत शांत मम चित्ता
रामा तुझे कोमल नाम घेता

तू जगताचा पालक त्राता
सकल दुक्खितांचा दैन्य हर्ता
दैन्य हरी करी सुखाची पुर्तता
रामा तुझे कोमल नाम घेता

सुनील जोशी

काय माझिया अंतरी....


फार खळबळ अंतरी
वाटे सांगावी कोणातरी
काय माझिया अंतरी
सांगेन मी केव्हातरी

बैरागी तो अन मी जोगन
अवचित होई मनोमिलन
अघटित हें कसे घडले
सांगेन मी केव्हातरी

आज मला उन्मत्त द्या जगु
अडवू नका, नका थांबवू
का होई अवस्था अशी ही
सांगेन मी केव्हातरी ....

सुनील जोशी
१५/११/२०१०

गंधित वेदना ....


कोण तू कुठलास तू
काय नाते आपुले
विरह वेदना छळती मना
आठवुनी क्षण एकांतातले

एकांतसमयी कातरवेळी
वेदना गंधित होतसे
पापण्यांना आसवांचा मग
भार तो होतसें

शब्द माझ्या कवितेतले
मग होती मुकें
जाणवे जणू
पापण्यांना भार झाली आसवें

सुनील जोशी
८/११/२०१०

मारवा वर्ज्य स्वरांचा......


घनसावळा असा तो
दावुनी आंस जाई
पडघम वाजवुनी तो
तसाच विरुनी जाई

शरदात चांदण्या राती
कोजागिरी मम मनाची
सुर कोकिळेचा परी येई
चंद्रास झाकोळुन जाई

न वांछिले जरी मी काही
नकार सख्याचा येई
निषिद्ध सुर जणू पंचमाचा
लागतसे मारव्या ठाई

सजतो मैफिलीत ह्या
मारवा वर्ज्य स्वरांचा
झाला लिलाव माझ्या
हळुवार भावनांचा ...

सुनील जोशी
१९/१०/२०१०

प्रेम







प्रेम असावे जिव्हाळ्याचे
नकोत पोकळ नाती
मनी असावी ओथम्बणारि
भिन्न नसावी त्याची जाती

त्या प्रेमामधे प्राण असवा
बोचणारा बाण नसावा
प्रेम असावे जिवलगाचे
तिथे नसावा  दूरदुरावा

त्या प्रेमाला अर्थ असावा
नको फसवा देखावा
अश्रूतूनही  प्रेम झरावे
आनंदाचे शेत फुलावे

या प्रेमातून प्रीत झरावी
हृदयातूनी ती ऐकू यावी
प्रेम - प्रचिती ऐसी यावी
प्रेमात ती बुडुनी जावी

सुनील जोशी
२०/०४/२०१४

सुन्या सुन्या मैफिलीत.......


आठव करिती बेजार
आज ती मैफिल नुरली
शब्द रुसले अन् स्वर हरवले
झाली सुनी सुनी ती मैफिल

प्रयास केले समाजवण्याचे
विफल कितिक ह्या मना
नसते रे होत सुनी केवळ
मैफिल शब्द अन् सुरा विना ...??...

समजावणे परी जगी राहिले
अनुभुतिचा हा मामला
सुर शब्द जाती सोडून
करीत मैफिलिला पोरका

ये तू ये ....
लेवुनी शब्द सुरांचे लेणे....
बरस अशी तू ..अशी बरस
देउनी शब्द सुरांचे दान ...
आण गं आण सखे तू ह्या
सुन्या सुन्या मैफिलीत आज... जान ....


सुनील जोशी
०८/०७/०९

शुन्य महिमा


एक टिम्ब एक शुन्य
वाढे शुन्य होई ब्रह्मांड
शुन्यातुनी आले अन
शुन्यची जहाले हें विश्व

शून्यासह ब्रह्मांड
शुन्याविण ब्रह्मांड
शुन्यवत ब्रह्मांड
शुन्य महिमा

शुन्यासी किंमत
स्वतःची न काही
परी वाढवी मूल्य
शुन्य इतरांचे

नवावरी नऊ शुन्य
होई नवकोट नारायण
जी परी सर्व इथेच सोडून
होई अन एक महाशुन्य

शुन्याने भागिले शुन्याला
जन्म अन अनंताचा जाहला
शुन्यातुन अनंत निर्मिला
असा शुन्याचा महिमा

राधे विन कृष्ण शुन्य
कृष्णाविन राधा शुन्य
कृष्णासह राधा ब्रह्मांड
अन ब्रह्मांड एक शुन्य

सुनील जोशी
१८/०२/२०१०

इवलसं मन....



मन अचाट मन अफाट
नाही मनाला थांबती वाट
कुठे धावते कुठे फिरते
कसे आवरू न हे कळते

आता आताच ते होतं इथे
आताच पळालं कसं तिथे
सांगू सांगू हो मी हे कसे
आता असेल नेमकं ते कुठे ?

कधी दुखात ते खंतावतं
आणी सुखामाजी सुखावतं
मनोव्यापाराच्या या झूळूका
सुखादुखाना त्या जोजवितं

इवलसं हे मन माझं
त्याच्या आपार या वाटा
त्याला कसं आवरू सावरू
जीव त्याच्यात हां गुंगला

सुनील जोशी

माया...


स्पर्शातील मायेचा ओलावा
डोळे मिटूनी पिऊनी घ्यावा
बहार नात्यातील असा बहरावा
अन जगण्यावर जीव जडावा

गुंजारव करीत भ्रमर तो यावा
मधु घटातुनी हळूच प्राशावा
अधर स्पर्श हळुवारची व्हावा
अन जगण्यावर जीव जडावा

आवाज अंतरी असा घुमावा
कटुतेचा लवलेशही नूरावा
वठ्ल्या वृक्षासी बहर तो यावा
अन जगण्यावर जीव जडावा

सुनील जोशी
२८/१२/११

मैत्री...

मैत्री...
 
जीवनाच्या या धकाधकित 
तसा मी खुपच व्यस्त आहे
पण त्या कारणाआड दडून 
आपल्यांनाच विसरणं .....
जमायचं नाहीच मला.....
 
असा जिवघेणा हा एकांत...
छळतोय सतत मला...
अन् तश्यात तुझी आठवण 
तुझ्या आठवणीं विना जगणं
जमायचं नाहीच मला 

उंची गाठायचं एक स्वप्न
जणू एक वेडचं लागलयं
पण त्या नादात उंचावरुन
विसरून जाणं मित्रांना
जमायंच नाहीच मला

सुनील जोशी
७/७/१४