Sunday, August 21, 2011

हातावरचं पोट......

धो धो पाउस कोसळतोय. कधीचा कोसळतोय. थोड़ा सुद्धा उसंत घेत नाहीय्ये.घरात मी आणि छोटी फ़क्त. कधी पासुनची रडत होती, आई ची वाट बघत . रडून रडूनथकली आणि आता निपचित पडली आहे झोळीत. तिला रडतांना बघून मला पण रडू येऊलागलं होतं. आणि आता माझे पण डोळे सुकून गेलेत. नेहेमी एव्हाना ती येउनजात असते. अड़कुन पडली असेल कुठेतरी ह्या पावसात. तिच्या जवळ तर छत्री पणनाही.कोसभर अंतरावर जावं लागतं रोज तिला. बाबा पण सकाळी सकाळीच जातात निघून.चौकात उभे रहातात , त्या मुकादमाची वाट बघत. नशिबात असलं तर भेटते रोजी.नाही तर मग बसून रहातात तिथेच दिवसभर. रोजी असली की त्या दिवशी भेटतेखायला , आणि त्यांच्या पण पव्व्य्याची होते सोय. पव्वा मारला तरी बाबागपचिप झोपून रहातात , भांडत नाही इतर लोकांसारखे.बाबा ला कधी रोजी मिलायची तर कधी दिवस भर बसून रहावं लागायचं. खाणारीतोंडं वाढायला लागलेली. मग आईने विचार केला आणी तिच्या आवाक्यात असलेलीकामं .....म्हणजेच चार घराची कामं धरलीत.ते सगळे लोक मोठ्या घराचे होते. आमच्या वस्तीला ते झोपड़पट्टी म्हणायचे.आई मला कधी कधी घेउन जायची त्यांच्या कड़े. माझ्या सारखीच त्यांच्याकडे पणलहान लहान मुलं असायचीत. पण ती सगळी शाळेत जायची. त्यांचे कपडे ,शाळेचेड्रेस वगैरे खुपच मस्त मस्त असायचे. मलापण वाटायचं आपण पण त्यांच्यासारखे कपडे घालावे, शाळेत जावं ..... पण .... हं ...आमच्या झोपड़पट्टी मधे म्हणे असं काही करत नसतात. त्या घराच्या मालकीणबाई कधी कधी मला खाऊ द्यायच्या... मला आवडायचा तो, आई कधीच नाही करायचीतसं काही घरी. ती मुलं मात्र मला कधीच त्यांच्यात खेलायला नाही घ्यायचीतत्यांच्यात. त्यांच्या लेखी आम्ही झोपड़पट्टी मधली मुलं.गावाच्या सीमेवर असलेल्या मारुती मंदिरा पासून पुढे एक रस्ता होतात्याच्या ही पुढे होती आमची ती वस्ती. गावकुसाबाहेर ची आमची ती वस्ती.आमच्या झोपडी सारख्याच अजुन २० एक झोपड्या होत्यात तिथे. सगळे राहणारेलोक तिथे झोपडितच रहायचे, आमच्या सारखे.माझ्या जन्माच्या ही अगोदर ...खुप आधी ... कधीतरी भटकत भटकत पोहोचले होतेम्हणे ते इथे. गावाकडे होते , मोलमजुरी करून पोट भरत होते ... आणि मगअचानक आक्रित घडलं ...तो महापुर काय आला... म्हणे होत्याचं नव्हतं करूनगेला. घर दार भांडीकुंडी...इतकाच काय तर घरातल्या म्हातारा आणिम्हातारीला पण घेउन गेला, परत कधीच ना दिसण्यासाठी.त्यानंतर त्या दोघांचं मन रमेना तिकडे. तसाही खुप काही लला नव्हताच त्यादोघांना तिथला. पण मग तर त्यांनी ठरवलचं ते गाव सोडायचं म्हणून. सोडायचंगाव हें तर ठरलं , पण नेमकं जायचं कुठे ...त्याचा काही पत्ता नव्हता. मगआले भटकत भटकत असेच ..अन पोहोचले ह्या महानगरात.त्यावेळी हें शहर तसं फार मोठं नव्हतं म्हणे. असेल दीड-दोन लाखाची वस्ती.पण काम मिलायचं. तेव्हा सुद्धा घरं भाड्यानी मिलायची पण ... कमाई अशीनव्हतीच . मग कोणी तरी त्यांना ही जागा दाखवली. उजाड़ माळरानावरची. तुरळकझोपड्या असलेली.कुठून तरी वासे आनले , तट्टे आनले .. आणि शाकारली एक झोपडी. मी माझ्यालहानपणा पासून बघतेय... अगदी तशीच, तेवढीच ... अजुनही.रात्रभर रिमझिमणारा पाउस, पहाटे पहाटे त्यांन चांगलाच वेग धरला होता.चंद्रमौळी झोपडीला असलेल्या ठीगलामधून रात्रभर टपटपणा-या थेबांना थोपवूनधरणा-या त्या प्लास्टिकच्या झोळ्या आता रामप्रहरीच राम म्हणणार असंवाटायला लागलं होतं. खालून काठीने ढूश्या मारून मारून ते साचलेलं पाणीबाहेर काढण्यात चानीन रात्र जवळ पास जागुन काढली होती.मधेच म्हाता-याला ढास लागली, खोकल्याची ती उबळ थांबता थांबेना. प्लास्टिकढोसता ढोसता मधेच चानी थांबली, म्हाता-या कड़े धावली, एखादा पेला पाणीद्यावं म्हणून , तर म्हाता-याचं नशीब असं फुटकं की माठात एक थेंब पाणीनव्हतं. इकडे धुवाधार बरसत होता आणि तिकडे प्यायला एक थेंब पाणीनाही....कसली विडंबना. मग तिन कसबसं म्हाता-याला उठवून बसवलं . आडव्याचाउभा केल्यान की बरच वेळ खोकलुन झाल्यामुळे असेल म्हणा.... नेमकं काय असेलते असो पण आता म्हाता-याचं खोकलण ज़रा थांबल्या सारखं वाटत होतं .निस्तेज चेहे-यान आणि जवळ पास निष्प्राण डोळ्यानी म्हातारा आजू बाजू लाटकमक टकमक बघत होता. त्याच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यात साठवलेल्याहोत्या त्या आठवणी. लहानशी चानी, तिची तिच्याहून लहान बहिन मुन्नी , चानीची माय ... सगळे कसे झरझर त्याच्या स्मृति पटलावर दिसत होते.रडून रडून थकली ... आणि झोपी गेलेली ती मुन्नी ...मग पुन्हा कधी उठलीचनाही. नंतर चानी आणि तिची माय , त्यांची आणि त्याची होणारी धावपळ... सगळसगळ कसं अगदी काल घडल्या सारखं वाटत होतं. जगण्याची अपरिहार्यता त्यांनाजगवित असावी.खुप खुप मेहेनत करू आणि स्वतःचे अगदी छोटेसे का होईना एक घर बांधू हीमंशा. पण रोजची कमाई फ़क्त पोटातच जिरून जायची. एखाद्या दिवशी नाही मिळालीरोजी की रोटीलाही मोताज असायचे ते लोक. कसंबसं जगण सुरु होतं.निस्तेजश्या चेहे-यावर चार सुरकुत्या अजुन वाढल्या. जगण सुरूच होतं. आताधावपळ पुर्विसारखी नव्हती होत , पण तरीही रोज ठिय्यावर बसून वाट पहांणसुरूच होतं. भाकरी सोबत कालवणाची सोय व्हावी म्हणून चानी ची मायदुरवरच्या चार घरी घरकाम करत होतीच. चानी आता मोठी झाली होती. त्याला कधीकाम मिळायचं तर कधी खाडा पडायचा. कधी मायला सणासुदीला चार घरी काहीमिळायचं , आणि मग त्याच्या कड़े रात्र साजरी व्ह्यायाची.त्या ही दिवशी असाच ठिय्यावर बसला होता , वाट बघत .... मुकादमाच्याबोलावण्याची. पण काही लक्षण दिसता नव्हतं. चानी... हो चानीच दिसत होतीती. दुरून धावत येत होती. बा ...बा.. ती त्याच्याजवळ पोहोचत धापा टाकितबोलू लागली. धावत आल्याने तिला धाप लागलेली होती. बा .... माय कशी कशी चकरते आहे .त्यानही मग काय विचार केला ... सोडला नाद रोजिचा ...आणि झप झप निघाला झोपडिकडे.लांब लांब ढांगा टाकत तो तड़क पोहोचला आणि कुडाचं दार लोटून आत शिरला. आतसामसूम जाणवली. त्या अंधारात त्याला आधी काही दिसलच नाही. मग दिसलीत्याला चानीची माय ... शांत झोपलेली ... कायमची ....त्याच्या पाठोपाठ शिरलेल्या चानी कड़े त्यांन बघितलं ,एकदा तिच्या कड़े आणिएकदा तिच्या माय कड़े बघत होता . एकदम भानावर आला आणि दुखःवेगाने मोठ्यानेहम्बरडा फोडला त्यांन .दिवस सरत होते. चानिनं आता मायची जागा घेतली होती. खाणारं एक पोट कमीझालं होतं. चानिनं नविन घरात कामं धरली होती. ही घरं जुन्या घरांपेक्षाजवळ होती. नवी वस्ती आता त्यांच्या उकिरडया च्या जवळ पोहोचली होती. त्याकॉलनी मधल्या सात आठ घरात भांडी धूण करून ती आता दोघांच्या पोटापुरतंमिळवून घेत होती .आता बरच उजाडलं होतं पावसाचा जोर पण ओसरला होता.बा ... येते रे मी .... म्हाता-या कड़े एक कटाक्ष टाकत ती ओरडली.किसनमामाच्या बावड़ी वरून एक कळशी भरून पाणी तिनं म्हाता-या जवळ ठेवलं .उगा सांड उबड़ नको करूस जरुरी असेल तर पी , असं सांगायला पण नाही विसरलीती त्याला.म्हाता-याची सोय लावून ती निघाली कामाला. पाउस आता पूर्ण थांबला होता.वस्ती ओलांडून ती पुढे निघाली. हमरस्त्याला लागुन असलेल्या कॉलोनी मधल्यानविन घरी कामे निपटवु आणि मग पुढे जावू असा विचार करत करत ती चालली होती.आणि तितक्यात तिला दिसले दोन मोठे बुलडोझर , वस्ती कड़े वळताना, त्याच्यामागे पोलिसांची मोठी निळी गाडी ...आणि त्यांच्या मागे एक काळी गाडी.बहुधा कोण्या शेठजिची असावी.... चानिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ....चानी तशीच वळली, वस्तीजवळ त्या सगळ्या गाड्या थांबल्या. पहीलेपोलिसांच्या गाडीतून भराभर पोलिस उतरलेत. त्यानंतर मागच्या काळ्यागाडीतून एक माणूस उतरला. धिप्पाड देहयष्टिचा, थोड़े पोटही सुटलेलं,डोळ्यावर काला गोगल घातलेला , आणि गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची चेन ,बहुधा शेठजी असावेत , कारण मागे होताच एक पिलांटू छत्री धरून मागेत्यांच्या.शेठजींनी एक नजर टाकली वस्तिकडे ... त्यांच्या नविन ले आउट कड़े... अचानकएक वा-याचा झोत आला , पलिकडच्या कच-याच्या ढीगावर मरून पडलेल्या अनसड्लेल्या कुत्र्याचा वास त्या झोताबरोबर नाकात शिरताच शेठजी कासाविसझाले , लगेच एक सुगंधी रुमाल पुढे आला.क्या गंदे लोग है , कैसे जीते है भगवान के बलासे ... चला रे उचला त्याझोपड्या पटपट... साले गलंग लोग ...लोक बोम्बलायला लागले ... पण कुणी पुढे यायची हिम्मत करी ना. पोलिस बघूनघाबरून गेले सगळे. जमेल तसं सामान जमा करायला लागले.चानीच्या हृदयात धस्स झालं. ती पळाली भरकन तिच्या खोपटाकडे. जमेल तसंसावडायला लागली, क्षणभर म्हाता-याला कळेच ना काय झालय ते. टकमक बगाह्त तोकिरकिरला... काय झाल वं चाने...काऊंन असी करतासं... पिसं लागलं का वं?चानीला बोलायला फुरसत नव्हती. म्हाता-या कड़े बघायला पण नव्हती फुरसत .भराभरा भांडी पोत्यात भरली आणि धावत जाउन वडाच्या पारावार ठेवून आली.म्हातारा खुरडत खुरडत खोपटाच्या दाराशी आला. परत खोपटात शिरत तिनंम्हाता-याची वळकटी उचलली आणि त्या बरोबर काही कपडे पण बांधले गाठुडयातआणि परत धावत जाउन ठेवून आली त्या पारावर. आता खुरडत खुरडत म्हातारा पणवडा जवळ पोहोचला , आणि टकमक टकमक बघू लागला.गणु पैलवान, बाबू सुतार च्या झोपड्या उखडून आता ते अजस्त्र धुड वळलं होतंचानीच्या वाडयाकडे! आपल्या खोपटावर फिरणारा तो नांगर बघून चानीच्याडोळ्यान्ना अश्रुधारा लागल्यात...वाढत्या शहराच्या गरजा भागवण्या साठी, उकिरडा संपवून तयार होणा-या ५७३व्या ले-आउट चं भूमि पूजन होणार होतं म्हणे.आणि त्याच वेळी अचानक धुवाधार पावसाला परत सुरुवात झाली ...

सुनील जोशी१७/०७/२०११

No comments:

Post a Comment