Saturday, July 6, 2019

वाहता वाहता... 

एक स्त्रोत वाहता वाहता
न जाणे कां सुकून गेला
ओघ आठवणींचा सहज
डोळ्यांवाटे वाहू लागला 

एक स्त्रोत वाहता वाहता
असां काही वाहून गेला
अडवण्या त्या प्रवाहाला
जोर माझा अपुरा पडला

एक स्त्रोत वाहता वाहता
यमुनेकाठीअसा थबकला
राधेच्या गालावरचा थेंब होऊनी
कृष्णाच्या प्राक्तनी रेंगाळला

एक स्त्रोत वाहता वाहता
आसूं आईच्या गालीचा जाहला
लेकीच्या पाठवणीच्या क्षणाला
महापूर आसवांचा आला

सुनील जोशी

No comments:

Post a Comment