Saturday, July 6, 2019

पाऊस

हा पाऊस ना अस्साच असतो
कधी हा धो धो धो धो कोसळतो
कधी अगदी शपथ घेतल्यासारखा
दूरवर कुठेतरी हरवून जातो

हा पाऊस ना अस्सा असतो
कधी आकाशाचा आनंदाश्रु असतो
तर कधी वाट पहाणा-या त्या
शेतकऱ्यांच्या डोळ्यातली करुणा असतो

हा पाऊस ना अस्सा असतो
कधी मनमुराद हसत असतो
आणि कधी कधी नाराज झालेल्या
बायको सारखा रुसून बसलेला असतो

हा पाऊस ना अस्सा असतो
त्याच्या आगमनाने निसर्ग हर्षतो
आणि रुसून बसला तो तर
हसरा निसर्ग ही कोमेजून जातो

हा पाऊस ना अस्सा असतो
हा पाऊस ना अस्साच असतो...

सुनील जोशी
०१-०७-२०१९

No comments:

Post a Comment