Saturday, July 6, 2019

विठू राया 


सावळ्या हरीचे
आवडे हे रुप
सावळे साजीरे
कृष्णरुप

विठ्ठल विठ्ठल
म्हणती तयाला
विटेवरी उभा
पंढरीला

पंढरीत दाटे
वैष्णवांचा मेळा
दाटतो उमाळा
हृदयी या

वाळवंटी वाहे
भीमा चंद्रभागा
हृदयात माझ्या
विठूराया 

सुनील जोशी

No comments:

Post a Comment