Saturday, February 20, 2010

मी एक वृक्ष ....

पथिक तो क्षीण जर्जर
शोधत आसरा निवांत
पखरून मायेची सावली
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

जाणूनी त्याची क्षुधा
मम वंश विस्तारक फल
अलगद अवतरवुनी सामोरी
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

येणार एक आप्त त्याचाच
करण्या संहार माझा उद्या
परी समाधान मनी हें की
जगलो जगविण्या त्याच्याच गोताला
जगुनी क्षण तो जगविण्याचा
जाहलो धन्य.....
मी एक वृक्ष ....

देऊनी आसरा त्याला
जरी तो गोत त्या संहारकचा
मनोमनी सुखावलो मी...
जाहलो धन्य...
मी एक वृक्ष ....

जीवन जगता जगता
अन शेवटच्या ही क्षणी
करिता कार्यासी माझ्या
आनंदलो मी ....
मी एक वृक्ष ....

मी एक वृक्ष ....


सुनील जोशी
१७/०१/२०१०

No comments:

Post a Comment