Saturday, February 20, 2010

पंचम वर्जुन ही जगणे.....

वर्ज्य पंचमाचे दान जे रे
मागितले होते तुज सखया
पंचम नव्हता तो भुपातला
वर्ज्य तो पंचम मारव्यातला

मारव्याने रे काय केले
आर्त सुर संध्येसी जागविले
अन मम जीवनी रे सख्या
ते सुर होते अवचित लागले

विचार केला बहु मनी की
का आर्त हा रे मारवा
भासला अन गवसला मग
वर्ज पंचम त्यातला.......

वर्जिता त्या पंचमासी
मारवा तो आर्तला.....
स्वीकारुनी का भूपा तयातें
आनंदघन मग जाहला?

जीवनाची मैफल ही
रंगली होती तशीच...
वर्ज्य पंचमाच्या आग्रहे
परी बेरंग का ती जाहली ?

नको आता सुर सखया
आणि ताल ही ना जीवनी
शिकले आता रे जीवनी ह्या
पंचम वर्जुन ही जगणे.....
पंचम वर्जुन ही जगणे.....

सुनील जोशी
२८/११/०९

No comments:

Post a Comment