Saturday, February 20, 2010

मी फिनिक्स.....

हस्ताच्या झरल्या धारा
धो धो बरसला तो घन
तन जाहले चिंब चिंब
परी मन कोरडेच राहिले
रित्या मनाला आस ती

ते अजुनी मृगजळ शोधते...

समाजबंधनी बंधित मी
उच्च स्थानी जावुनी बैसलों
नाना प्रकारे सन्मानित जाहलो
परीटघडित ही आज परी सारे
विस्कटल्या गत वाटते ...

भितीच्या त्या खोल डोही
बाल्य ते कसे हरवून गेले
अनिवार मी ऐसा बुडालो
अन काय सांगू ह्या सशाला
अजुनही भीती ढगांची वाटते

स्वप्न विश्वी विहरताना
मी स्वप्न होते पाहिले
स्वप्न ते केवळ स्वप्न उरले
परी ह्या सत्य सृष्टिने ऐसे
मला उध्वस्त करुनी टाकले..

फिनिक्स पक्षाचा वंशज मी
आज राख जरी मी जाहलो
नष्ट करण्या जरी त्यांनी
काहीच कमी ना सोडले
राखेतुनी त्या माझ्या मीच

उड़ण्या परत सज्ज जाहलो ....

सुनील जोशी
१४/०२/२०१०

No comments:

Post a Comment