पौर्णिमा उद्याची ती
आज माझ्या सन्मुख होती
सौंदर्याची मुक्त हस्ते ती
उधळण जणू करीत होती
अदांनी मादक तिच्या ती
मोहवित मजला होती
इमानाची माझ्या जणू ती
सत्व परीक्षा घेत होती
पुनवेच्या चंद्रासम छबि ती
चिंतातुर परी भासत होती
हतबलशी अन दडपणात ती
ग्रहणाच्या जणू जगत होती
आठवली मग चंद्रकोर ती
जी अपूर्णशी, चतुर्दशिची होती
मुक्त सावटातुनी ग्रहणाच्या ती
खळाळुनी मुक्त हसत होती.
असेल जरी अपूर्ण किंचित ती
तेजाने परी ती झळाळत होती
अन अपूर्णतेतही समाधान ती
चंद्रकोर भरभरून जगत होती
पोर्णिमेच्या पूर्ण चंद्राची आता ती
वाटते मनोमनी मजला भीती
चतुर्दशिची अपूर्ण जरी ती
चंद्रकोरची लाविते मज प्रीति
सुनील जोशी
२०/१२/२०११
आज माझ्या सन्मुख होती
सौंदर्याची मुक्त हस्ते ती
उधळण जणू करीत होती
अदांनी मादक तिच्या ती
मोहवित मजला होती
इमानाची माझ्या जणू ती
सत्व परीक्षा घेत होती
पुनवेच्या चंद्रासम छबि ती
चिंतातुर परी भासत होती
हतबलशी अन दडपणात ती
ग्रहणाच्या जणू जगत होती
आठवली मग चंद्रकोर ती
जी अपूर्णशी, चतुर्दशिची होती
मुक्त सावटातुनी ग्रहणाच्या ती
खळाळुनी मुक्त हसत होती.
असेल जरी अपूर्ण किंचित ती
तेजाने परी ती झळाळत होती
अन अपूर्णतेतही समाधान ती
चंद्रकोर भरभरून जगत होती
पोर्णिमेच्या पूर्ण चंद्राची आता ती
वाटते मनोमनी मजला भीती
चतुर्दशिची अपूर्ण जरी ती
चंद्रकोरची लाविते मज प्रीति
सुनील जोशी
२०/१२/२०११
No comments:
Post a Comment