हेमंती उष्ण हवा
संध्या ल्यायली साज नवा
रात्रीच्या गर्भात गारवा
रंगु दे बेभान मारवा
हेमंती उष्ण हवा
मिठीतला तुझ्या विसावा
सखया लावी वेड जीवा
भिनु दे गात्रात मारवा
हेमंती उष्ण हवा
हर्षी मनी अबोल रावा
मौनास आज अर्थ नवा
जुन्याच स्वरांचा मारवा
हेमंती उष्ण हवा
जुना स्पर्ष होतसे नवा
सृष्टीचा जणू स्पंद नवा
उत्तर रात्रीचा मारवा
हेमंती उष्ण हवा
ना जगलो ऋतू बरवा
उमगे आज नवा नवा
नाही जगलो जो मारवा
सुनील जोशी
२४/११/२०१०
No comments:
Post a Comment