सखी माझी असते कधी कठोर
भासते अन कधी दुर्गेचा अवतार
कधी होते ती मधाहुनि मधुर
बावरतो मी बघुनी तुझे ते रूप
कधी असते ती बहर तो वसंतातला
कधी होते ती दाह त्या ग्रीष्मातला
कधी करते ती घन घन घोर वर्षाव त्या मायेचा
होते अन शीतल चांदणे जणू ऋतू शरदाचा
कधी हेमंतातली हेममयी ती उष्ण हवा
अन कधी थकलेला निष्पर्ण तो शिशिर सखा
असते ती अश्या विविध रंग ढंगात
परी असते ती सखी या एकाच त्या वेशात
लाख बहाणे सांगेन जरी मी नाना
परी गाईन मी सखे तव सुखाचाच तराणा
सुनील जोशी
१४ जानेवारी २०१४
No comments:
Post a Comment