प्रेम असावे जिव्हाळ्याचे
नकोत पोकळ नाती
मनी असावी ओथम्बणारि
भिन्न नसावी त्याची जाती
त्या प्रेमामधे प्राण असवा
बोचणारा बाण नसावा
प्रेम असावे जिवलगाचे
तिथे नसावा दूरदुरावा
त्या प्रेमाला अर्थ असावा
नको फसवा देखावा
अश्रूतूनही प्रेम झरावे
आनंदाचे शेत फुलावे
या प्रेमातून प्रीत झरावी
हृदयातूनी ती ऐकू यावी
प्रेम - प्रचिती ऐसी यावी
प्रेमात ती बुडुनी जावी
सुनील जोशी
२०/०४/२०१४
No comments:
Post a Comment