Wednesday, May 25, 2016

ग्रहण आणि रूळ

रेलवेच्या रुळान्चा समांतर प्रवास
वर्षानुवर्षे अविरत सदा सुरूच आहे
अगदी सुरुवातीपासूनच त्यांना
एकमेकांना भेटीची आस आहे
सूर्य चन्द्र त्यांच्या तर
खुप आधीपासून आहेत
एकमेकांना भेटण्यासाठी
पाठ शिवणीचा खेळ त्यांचा
युगानुयुगे तसा सुरूच आहे

समोरा समोर जेव्हा येतात ते
तर मधेमधे ती पृथ्वी कडमडते
आणि सामना होण्या आधीच
एकाला ग्रहण लागुन जाते

सगळ होतं मग काळ कुट्ट
जणू लागते की काय त्यांना
एकमेकान्चिच अशी काही दृष्ट

पण आमचे रुळ तसे बरे आहेत
आस ठेवतात एकमेकांच्या भेटीची
पण हव्यास मात्र नसतो त्यात

कारण माहिती आहे त्यांना की
असला हव्यास पडू शकतो महाग
अपघात रूपी ग्रहण लागण्यापेक्षा
असं समंतार धावण बरय की

दुरून दुरून का होईना
एकमेकांच्या नजरेत तर असतो
अंतर ठेवून पण करता येते की
प्रेम ..अगदी युगानु युगे ....

सुनील जोशी
December 20, 2015

No comments:

Post a Comment