Wednesday, May 25, 2016


हे अन ते जळणे...


जळते ज्योत मंद दिव्याची
जळते अन चिता माणसाची
एक आणिते समाधान मुखावरी
आणि अन एक अश्रू नयनांतरी

दोन्ही जरी क्रिया जळण्याच्या
अन्तर सरळ दिसते जळण्यात ते
असे एक हे जळणे
अन असे एक ते जळणे...

प्रेमाग्नी जळतसे तो हृदयात
अन जाळी विरहाग्नी हृदयास
प्रेमाने जळालेला समाधानी
अन विराहाग्निताला तो दुखी

जळते जरी हृदय दोन्ही ठायी
अन्तर सरळ दिसते जळण्यात ते
असे एक हे जळणे
अन असे एक ते जळणे...

सुनील जोशी

No comments:

Post a Comment