Monday, May 23, 2016

महिला दिन महिला दीन ….

साजरा करूया महिला दिन
अन् उद्या पासून महिला दीन
खरच करतोय का कदर
आपण आपल्याच प्रतिबिंबाची? ….1
पोळा आणी महिला दिवस,
साजरा करायचा एक दिवस,
आणि उद्याच लावायचं कामाला
परत राबणार्या त्या जीवाला, …..2
जिव्हाळ्याचे चटके लावायचे,
महिलांचा उदो उदो करायचा,
पण त्या समोर जाणार नाहीत
याची काळजी पूर्ण घ्यायची ……3
महिलांचे प्रश्न जमवायचे,
त्या कागदाची घडी घालायची
छान गुंडाळून ठेवून द्यायची
पुन्हा उघडायची पुढच्या वर्षीच …..4
छान मोठी भाषणे करायची,
मोठ्या मोठ्या गप्पा हाणायच्या
आणी दुसऱ्याच दिवसापासून
करायचं सुरू येरे माझ्या मागल्या …5
असा महिला दिन साजरा करायचा
स्वतःच्या पाठीवर थोपटून घ्यायचं
परत पुढच्याच दिवसापासून
बघायची वाट,पुढच्या महिला दिनाची…..6
सुनील जोशी
०८ मार्च २०१६

No comments:

Post a Comment